December 28, 2025 7:36 PM December 28, 2025 7:36 PM

views 85

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती

काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीनं मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी आघाडीची घोषणा केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वंचित आघाडीचे नेते धैर्यवर्धन पुंडकर यांनी आज संयुक्त पत्रकार परिषदेत या आघाडीची घोषणा केली. या आघाडीअंतर्गत मुंबईतल्या २२७ जागांपैकी ६२ जागा वंचित बहुजन आघाडी लढवणार आहे.   संविधानाला अभिप्रेत भारत घडवणं हाच दोन्ही पक्षांचा राजकीय अजेंडा असल्यानं दोन्ही पक्षांतली मैत्री नैसर्गिक स्वरूपाची असल्याचं हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितलं. राज्यातील अन्य २८ महापालिकांसा...

October 21, 2024 7:22 PM October 21, 2024 7:22 PM

views 38

विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून पाचवी यादी जाहीर

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून पाचवी यादी जाहीर झाली आहे. यात मुंबईतल्या ७ जागांचा समावेश आहे. जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातून परमेश्वर रणशूर, दिंडोशीतून राजेंद्र ससाणे, मालाडमधून अजय रोकडे, अंधेरी पूर्वमधून संजीव कुमार कलकोरी, घाटकोपर पश्चिममधून सागर गवई तर पूर्वेतून सुनीता गायकवाड आणि चेंबुरमधून आनंद जाधव यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्याखेरीज ऐरोली, ओवळा माजिवडा, रिसोड, भुसावळ, मेहकर, मूर्तिजापूर, बारामती, श्रीगोंदा आणि उदगीर मतदारसंघांच्या उमेदवारांची घोषणा झाली आहे.  &nbsp...

October 19, 2024 8:19 PM October 19, 2024 8:19 PM

views 21

विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीची चौथी यादी जाहीर

आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीनं १६ उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. यात शहादा,  साक्री, तुमसर, अर्जुनी मोरगाव, हदगाव, भोकर, कळमनुरी, सिल्लोड, कन्नडमधून, औरंगाबाद पश्चिम, पैठण, महाड, गेवराई, आष्टी, कोरेगाव, कराड दक्षिण या मतदारसंघांचा समावेश आहे.

October 16, 2024 6:56 PM October 16, 2024 6:56 PM

views 14

अनुसूचित जातींसाठीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी स्थापन केलेल्या समितीला वंचित बहुजन आघाडीचा विरोध

राज्यातल्या महायुती सरकारनं अनुसूचित जातींसाठीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी स्थापन केलेल्या समितीला वंचित बहुजन आघाडीनं विरोध केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत ही भूमिका मांडली. राज्य सरकारनं काल अध्यादेश काढून यासाठी निवृत्त न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे. मागासवर्गीयांचं आरक्षण निकामी करण्याच्या उद्देशानंच हा अध्यादेश महाविकास आघाडीतल्या घटक पक्षाच्या संमतीनं काढला असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.

September 22, 2024 9:48 AM September 22, 2024 9:48 AM

views 8

वंचित बहुजन आघाडीची आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काल आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात औरंगाबाद पूर्व मतदासंघातून विकास दांडगे, नांदेड दक्षिणमधून फारूक अहमद, नांदेड जिल्ह्यातल्या लोहा मतदारसंघातून शिवा नारांगले यांना उमदेवारी देण्यात आली आहे. याशिवाय रावेर, सिंदखेड राजा, वाशिम, धामणगाव रेल्वे, नागपूर दक्षिण पश्चिम, साकोली शेवगाव आणि खानापूर मतदारसंघातले उमेदवार त्यांनी जाहीर केले. विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणार नसल्याचं आं...