November 3, 2025 7:11 PM November 3, 2025 7:11 PM
16
व्हॅलेन्सियाचे अध्यक्ष कार्लोस माझोन यांचा राजीनामा
व्हॅलेन्सियाचे अध्यक्ष कार्लोस माझोन यांनी देशांतर्गत झालेला जनक्षोभ आणि राजकीय दबावामुळे राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. व्हॅलेन्सियात गेल्या वर्षी आलेल्या पुरामुळे २२९ जणांचा बळी गेला होता. पुरावेळी पत्रकारासोबत जेवण करण्यात वेळ घालवल्याने आपत्कालीन सूचना जारी करण्यासाठी विलंब केल्याचा आरोप माझोन यांच्यावर होता. यानंतर माझोन यांच्या राजकीय विरोधकांकडून सातत्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती.