March 11, 2025 4:02 PM March 11, 2025 4:02 PM
22
वैभववाडी-गगनबावडा घाट रस्त्यावर आता पुन्हा गाड्या धावणार
सिंधुदुर्गला कोल्हापूरशी जोडणारा वैभववाडी-गगनबावडा घाट रस्ता आजपासून खुला करण्यात आला आहे. हा घाटरस्ता दुरुस्ती आणि रुंदीकरणासाठी गेल्या १५ जानेवारीपासून बंद केला होता. काही दिवसांपूर्वी या मार्गावरून एकेरी वाहतूक सुरु झाली होती आणि आजपासून दुहेरी वाहतूक सुरु करण्याचे आदेश सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. दाजीपूर -राधानगरी मार्ग ३० एप्रिलपर्यंत बंद राहणार असल्यानं या नव्यानं सुरु झालेल्या रस्त्याचा उपयोग वाहनचालकांना करता येणार आहे.