June 20, 2024 8:36 PM June 20, 2024 8:36 PM
6
‘वाढवण बंदर प्रकल्पामुळे राज्याच्या जीडीपीमध्ये १ टक्का वाढ होईल’
वाढवण बंदर प्रकल्प हा भारताच्या भविष्यासाठी अतिशय महत्वाचा प्रकल्प असून यामुळे राज्याच्या जीडीपीमध्ये एक टक्के वाढ होईल, असा विश्वास जेएनपीए अर्थात जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणचे प्रमुख उन्मेष वाघ यांनी व्यक्त केला. ते मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. कंटेनर वाहतुकीसाठी मुंद्रा आणि जेएनपी या बंदराची क्षमता कमी पडत असून यासाठी वाढवणसारख्या बंदराची गरज आहे. या बंदरानंतर पश्चिम भारताला नव्या बंदराची गरज उरणार नाही, तसंच मुंबईचं महत्त्व अबाधित राहील असं वाघ म्हणाले. वाढवण बंदरासाठी जमीन अध...