July 16, 2025 7:26 PM July 16, 2025 7:26 PM
26
‘वाढवण बंदर’ केवळ बंदर नव्हे तर एक आर्थिक क्रांती घडवून आणणारा केंद्रबिंदू ठरेल – मुख्यमंत्री
वाढवण बंदराच्या उभारणीमुळे महाराष्ट्र आणि भारत सागरी महासत्ता होण्याच्या दिशेनं वेगानं वाटचाल करत असून, हा प्रकल्प केवळ बंदर नव्हे तर एक आर्थिक क्रांती घडवून आणणारा केंद्रबिंदू ठरेल, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी केलं आहे. राज्य शासनाच्या मत्स्य व्यवसाय, बंदरे विभाग, आणि महाराष्ट्र सागरी मंडळाच्या वतीनं आयोजित ‘सागरी शिखर परिषद २०२५’ चं उद्घाटन करताना ते बोलत होते. भविष्यात भारत हा जागतिक सप्लाय चेनमधला महत्वाचा भागीदार बनू शकतो. म्हणूनच केंद्र सरकारनं ‘इंडिया...