September 26, 2024 2:18 PM September 26, 2024 2:18 PM
9
एशियन इंफ्रास्ट्रक्चर इन्वेस्टमेंट बँकेच्या ९व्या वार्षिक बैठकीच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्र्यांनी घेतली उझबेकिस्तानच्या राष्ट्रपतींची भेट
एशियन इंफ्रास्ट्रक्चर इन्वेस्टमेंट बँकेच्या ९व्या वार्षिक बैठकीच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल समरकंदमध्ये उझबेकिस्तानचे राष्ट्रपती शवकत मिर्जियोयेव यांची भेट घेतली. डिजिटल तंत्रज्ञान, फिनटेक, कृत्रिम बुद्धिमत्ता, अक्षय ऊर्जा, अणुऊर्जेचा नागरी उपयोग, आरोग्यसेवा आणि फार्मा क्षेत्रातल्या सहकार्याला चालना देण्यासाठी दोन्ही देशांदरम्यान यावेळी चर्चा झाली.