September 24, 2025 10:37 AM September 24, 2025 10:37 AM

views 9

उत्तरप्रदेश आणि गुजरात राज्यांमधून प्रमुख डाळी आणि तेलबियांच्या खरेदीला मंजुरी

केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी उत्तरप्रदेश आणि गुजरात या दोन राज्यांमधून प्रमुख डाळी आणि तेलबियांच्या खरेदीला मंजुरी दिली आहे. यामध्ये दोन्ही राज्यांमधून उडीद, तूर,मूग या डाळींच्या पूर्ण खरेदी सोबतच तीळ, भुईमूग आणि सोयाबीन या तेलबियांच्या खरेदीलाही मान्यता दिली आहे. त्यासाठी अंदाजे १३ हजार आठशे कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. ही पूर्ण खरेदी प्रक्रिया पारदर्शक, डिजिटल आणि शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून पार पाडण्याची गरज चौहान यांनी काल त्यांच्या अध्यक्षतेखाली दूरस्थ पद्धतीनं झाले...

September 11, 2025 8:03 PM September 11, 2025 8:03 PM

views 11

भारत आणि मॉरिशस यांच्यात ४ सामंजस्य करार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी इथं मॉरिशसचे प्रधानमंत्री नवीनचंद्र रामगुलाम यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. यावेळी भारत आणि मॉरीशस यांच्यात चार सामंजस्य करार झाले. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्याचा करार, राष्ट्रीय सागरीविज्ञान संस्था आणि वैज्ञानिक औद्योगिक संशोधन परिषदेचा मॉरिशसच्या सागरीविज्ञान संस्थेबरोबरचा करार, प्रशासकीय सुधारणासाठी उभय देशातल्या कार्मिक आणि निवृत्तीवेतन विभागांमधला करार, तसंच दूरसंवाद, आणि अंतराळविज्ञान क्षेत्रात सहकार्यासाठीचा करार यांचा त्यात समावेश...

February 20, 2025 1:16 PM February 20, 2025 1:16 PM

views 14

जौनपूर इथं दोन वेगवेगळ्या अपघातात 8 भाविकांचा मृत्यू

उत्तर प्रदेशातल्या जौनपूर इथं काल रात्री उशीरा झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात आठ भाविकांचा मृत्यू झाला असून ३२ जण जखमी झाले आहेत.   पहिल्या अपघातात बदलापूर भागात सुल्तानपूर रस्त्यावर भाविकांना घेऊन जाणाऱ्या चारचाकीला अज्ञात वाहनानं धडक दिल्यानं पाच जणांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले. मृतांमधे 3 महिला आणि एका बालकाचा समावेश आहे. हे भाविक अयोध्येला जात होते.    दुसऱ्या अपघातात डबल डेकर बसची ट्रकला धडक झाल्याने तीन जणांचा मृत्यू झाला, तर २७ जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आ...

February 13, 2025 2:36 PM February 13, 2025 2:36 PM

views 10

उत्तरप्रदेशात झालेल्या अपघातात ४ मजुरांचा मृत्यू, १६ जखमी

उत्तरप्रदेशात शाहजहांपूर इथं काल रात्री एका गाडीनं दुसऱ्या गाडीला धडक देऊन झालेल्या अपघातात ४ मजुरांचा मृत्यू झाला तर १६ जण जखमी झाले. हे मजूर हरियाणा मध्ये मजुरीसाठी जात होते.  जखमींना फर्रुखाबाद जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली.