August 6, 2025 3:40 PM August 6, 2025 3:40 PM

views 18

उत्तराखंडमधे पुरात ११ जवान बेपत्ता, तर १३० नागरिकांना वाचवण्यात यश

उत्तराखंडमध्ये झालेल्या भीषण ढगफुटीमुळे आलेल्या पूरस्थितीत सेनेचे ११ जवान बेपत्ता झाले आहेत, अशी माहिती राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे मोहसिन शहीदी यांनी दिली. राष्ट्रीय तसंच राज्य आपत्ती प्रतिसाद दलासह लष्कराची पथकं युद्धपातळीवर मदत आणि शोधकार्य करत आहे. आतापर्यंत १३० जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं असून त्यांच्यासाठी अन्न, पाणी आणि औषधाची सोय करण्यात आली आहे. उत्तराखंडमधे पुरात अडकलेल्या नागरिकांमधे महाराष्ट्रातल्या ५१ नागरिकांचा समावेश आहे. त्यांचा नातेवाईकांशी संपर्क झाला असून  ते सुखरूप...

August 5, 2025 8:16 PM August 5, 2025 8:16 PM

views 2

उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात ढगफुटी आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्त हानी

उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात धराली इथं आज दुपारी झालेली ढगफुटी आणि खिरगंगा नदीला आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणावर जिवीत आणि वित्त हानी झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे. या पुरामुळे धऱाली इथली संपूर्ण बाजारपेठ उद्धवस्त झाली आहे. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाल्याचं उत्तरकाशीचे जिल्हाधिकारी प्रशांत आर्य यांनी सांगितलं.   लष्कराच्या जवानांचं पथक, SDRF, NDRF, जिल्हा प्रशासनानं घटनास्थळी तातडीनं मदत आणि बचाव कार्य सुरू केलं असून १५ ते २० नागरिकांना स...

July 3, 2025 11:22 AM July 3, 2025 11:22 AM

views 10

उत्तरकाशी इथं गेलेले राज्यातले सर्व पर्यटक सुरक्षित

उत्तराखंडमध्ये उत्तरकाशी इथं गेलेले राज्यातले सर्व पर्यटक सुरक्षित असल्याचं प्रशासनानं कळवलं आहे. हे सगळे पर्यटक जानकीचट्टी इतं असून त्यांच्या राहण्याची, जेवणाची आणि वैद्यकीय मदतीची व्यवस्था उत्तराखंड सरकारनं केली आहे.   दरम्यान, या पर्यटकांशी काल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीवरुन संवाद साधला आणि काही अडचण आल्यास त्वरित संपर्क साधा असं सांगितलं. उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांसोबतही शिंदे यांनी संपर्क साधला. राज्यातले दीडशे पर्यटक उत्तराखंडमध्ये अडकले आहेत.