February 15, 2025 11:03 AM February 15, 2025 11:03 AM

views 17

उत्तराखंड इथं 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचा समारोप

उत्तराखंड इथं सुरू असलेल्या 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचा काल समारोप झाला. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते, यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांचं सादरीकरण झालं.   उत्तराखंड सरकारनं स्पर्धांचं यशस्वी आयोजन केल्याबद्दल शहा यांनी सरकारचं अभिनंदन केलं. 2036 मध्ये ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांचं यजमानपद भूषवण्यासाठी भारत वचनबद्ध असून यासाठी देश पूर्णपणे सज्ज आहे असं शहा यांनी सांगितलं.   39 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा मेघालयमध्ये होतील अशी घोषणा त्यांनी...

February 7, 2025 5:17 PM February 7, 2025 5:17 PM

views 11

३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये पदकतालिकेत महाराष्ट्राकडे सर्वाधिक ९४ पदकं

उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्र पदकतालिकेत पुन्हा तिसऱ्या स्थानावर आला असून महाराष्ट्राकडे सर्वाधिक ९४ पदकं आहेत. त्यात १९ सुवर्ण,३८ रौप्य आणि ३७ कास्यपदकांचा समावेश आहे.

February 6, 2025 1:53 PM February 6, 2025 1:53 PM

views 13

उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राची सर्वाधिक ८५ पदकांची कमाई

उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक ८५ पदकांची कमाई केली आहे. त्यात १६ सुवर्ण, ३६ रौप्य आणि ३३ कास्यपदकांचा समावेश आहे. पदकतालिकेत मात्र महाराष्ट्र चौथ्या स्थानावर गेला आहे. पहिल्या स्थानावर कर्नाटक, त्यानंतर दुसऱ्या स्थानावर सेना दलांचा आणि तिसऱ्या स्थानावर मध्य प्रदेशाचा समावेश आहे. तसंच, हरयाणा, तामिळनाडू, मणिपूर, दिल्ली, केरळ आणि पंजाब यांचा पहिल्या दहा संघांत समावेश आहे. यजमान उत्तराखंडचा संघ ३३ पदकांसह पदकतालिकेत पंधराव्या स्थानावर आहे.

February 3, 2025 3:38 PM February 3, 2025 3:38 PM

views 24

उत्तराखंडमध्ये सुरु असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्र १३ सुवर्ण पदकांसह तिसऱ्या स्थानावर

३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र १३ सुवर्ण पदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे. मात्र २५ रौप्य आणि १७ कांस्य पदकं जिंकून महाराष्ट्राने सर्वाधिक ५५ पदकं जिंकली आहेत. सेना दल संघाला १८ आणि कर्नाटकला १७ सुवर्णपदकं मिळाली आहेत. मात्र सेना दल संघाला १० रौप्य आणि ८ कांस्य तर कर्नाटकला ९ रौप्य आणि ९ कांस्य पदकं असल्याने सेना दल संघ पदकतालिकेत पहिल्या स्थानावर आहे, तर कर्नाटक दुसऱ्या स्थानावर आहे. तर मणिपूर ११ सुवर्ण पदकांसह चौथ्या तर मध्यप्रदेश ९ सुवर्ण पदकांसह पाचव्या स्थानावर आहे. तामिळनाडू आणि ...

January 27, 2025 2:52 PM January 27, 2025 2:52 PM

views 46

उत्तराखंडमध्ये आजपासून समान नागरी कायदा लागू

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर समान नागरी कायदा लागू करणारं उत्तराखंड हे देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे.  उत्तराखंडचे  मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी आज डेहराडून इथं या कायद्यासंबंधीचे नियम आणि इतर माहिती देणाऱ्या पोर्टलचं उद्घाटन केलं. विवाह, घटस्फोट, वारसाहक्क, आणि लिव्ह इन नातेसंबंधांसह अनेक बाबींमधे हा कायदा लागू झाला आहे. 

January 20, 2025 7:44 PM January 20, 2025 7:44 PM

views 15

उत्तराखंड राज्य मंत्रिमंडळाची समान नागरी संहितेला मान्यता

उत्तराखंड राज्य मंत्रिमंडळाने आज समान नागरी संहितेला मान्यता दिली. तात्काळ प्रभावानं त्याची अंमलबजावणी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी केली. या निर्णयामुळे उर्वरित राज्यांना त्याची प्रेरणा मिळेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.  

December 12, 2024 3:38 PM December 12, 2024 3:38 PM

views 10

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या हस्ते जागतिक आयुर्वेद परिषद आणि आरोग्य एक्स्पो २०२४चं उदघाटन

जागतिक आयुर्वेद परिषद आणि आरोग्य एक्स्पो २०२४चं उदघाटन आज उत्तराखंडमधल्या डेहराडून इथं उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या हस्ते झालं. ही आयुर्वेद परिषद जगभरातील तज्ज्ञ, संशोधक आणि अभ्यासकांना एकत्र आणून प्राचीन उपचार परंपरा आणि आरोग्यसेवा उद्योगातल्या अत्याधुनिक नवकल्पनांमधील समन्वय साधण्याच्या दृष्टीनं महत्त्वाची ठरेल, असा विश्वास धामी यांनी व्यक्त केला.

November 18, 2024 10:02 AM November 18, 2024 10:02 AM

views 15

हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर बद्रीनाथ धामचे दरवाजे बंद

उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील श्री बद्रीनाथ धामचे दरवाजे कडक हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर काल रात्री नऊ वाजता बंद करण्यात आले. त्यानिमित्त काल बद्रीनाथ मंदिर १५ क्विंटल झेंडूच्या फुलांनी सजवण्यात आले होते. मंदिराच्या सिंहद्वार संकुलात गढवाल स्काऊट बँडतर्फे वंदन करण्यात आलं. त्या भक्तिमय सुरांनी संपूर्ण बद्रीनाथ परिसर दुमदुमून गेला होता.   शनिवारी चमोलीचे जिल्हा दंडाधिकारी संदीप तिवारी यांनी बद्रीनाथ धामला भेट देऊन मंदिर बंद करण्याच्या व्यवस्थेचा आढावा घेतला. यासोबतच त्यांनी संपूर्ण प्रवासाद...

November 9, 2024 8:11 PM November 9, 2024 8:11 PM

views 13

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडच्या २५व्या स्थापनादिनानिमित्त दिल्या शुभेच्छा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडच्या २५व्या स्थापनादिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. उत्तराखंड राज्यानं विविध क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करुन विकासाची नवी उंची गाठली आहे, असं त्यांनी यानिमित्त आयोजित कार्यक्रमात दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून बोलताना सांगितलं. केंद्र सरकार उत्तराखंडच्या प्रगतीसाठी वचनबद्ध असून आगामी २५ वर्षात राज्यानं विकसित भारतासाठी विकसित उत्तराखंड हे ध्येय समोर ठेवून कार्य करावं, असं ते म्हणाले.

November 4, 2024 8:17 PM November 4, 2024 8:17 PM

views 9

उत्तराखंडमधे बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात ३६ जणांचा मृत्यू, १९ जखमी

उत्तराखंडमधल्या अल्मोडा जिल्ह्यात आज एक बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात ३६ जणांचा मृत्यू झाला तर १९ जण जखमी झाले आहेत. या बसमध्ये ५५ प्रवासी होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या अपघाताविषयी तीव्र शोक व्यक्त केला आहे. अपघातातल्या मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री साहाय्यता निधीतून प्रत्येकी २ लाख रुपये तर जखमींना ५० हजार रुपयांचं अर्थसाहाय्य मिळणार आहे. मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी ४ लाख तर जखमींना १ लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणाही धामी यांनी केली आहे.