August 9, 2025 3:05 PM August 9, 2025 3:05 PM
6
उत्तरकाशीमध्ये धाराली इथं गेलेले महाराष्ट्रातले सर्व पर्यटक सुरक्षित
उत्तराखंडमध्ये, उत्तरकाशी जिल्ह्यातल्या धराली इथं आपद्ग्रस्त भागात मदत आणि बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या यंत्रणा बेपत्ता झालेल्यांचा शोध घेत आहेत, तसंच परिसरातल्या पायभूत सुविधा सुरळीत करण्याच्या प्रयत्नात आहेत. आज सकाळी ७४ जणांची सुटका करून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं. लष्कर, एनडीआरएफ, एसडीआरएफ, पोलिस आणि स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने आपत्तीग्रस्त भागात अडकलेले यात्रेकरू आणि स्थानिक नागरिकांचं बचावकार्य सुरू आहे. महाराष्ट्रातून आलेल्या यात्रे...