March 1, 2025 8:11 PM March 1, 2025 8:11 PM
19
उत्तराखंडमध्ये हिमस्खलनात ४ जणांचा मृत्यू
उत्तराखंडमधल्या चमोली जिल्ह्यातल्या माना गावाजवळ काल सकाळी हिमस्खलनात अडकलेल्या कामगारांपैकी ४ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ५० कामगारांना वाचवण्यात यश आलं असून उर्वरित ५ कामगारांना वाचवण्यासाठी पथकं शोध मोहिमेत गुंतली आहेत. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी घटनास्थळी जाण्यासाठी रवाना झाले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी धामी यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. तसंच सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं.