December 5, 2025 1:38 PM

views 27

उत्तराखंडमध्ये वाहन दरीत कोसळून झालेल्या अपघातात ५ जण ठार, ५ जखमी

उत्तराखंडच्या चंपावत जिल्ह्यात काल रात्री एक वाहन दरीत कोसळून झालेल्या अपघातात ५ जण ठार झाले असून ५ जण जखमी झाले आहेत. जखमींना लोहाघाट इथल्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. उतराखंडच्या पाटी ब्लॉक येथे लग्न समारंभ आटोपून परत येत असताना त्यांचं वाहन बाग धार इथल्या खोल दरीत कोसळून हा अपघात झाला. अपघाताचं वृत्त समजताच स्थानिकांनी तातडीनं मदतकार्य सुरु केलं. 

July 2, 2025 2:07 PM

views 24

उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे अडकलेल्या महाराष्ट्रातल्या पर्यटकांना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मदत

उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे अडकलेल्या महाराष्ट्रातल्या पर्यटकांना मदत करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. भूस्खलनात परतीचा मार्ग वाहून गेल्यामुळे २८ जूनपासून उत्तराखंडमधील यमुनोत्री धामजवळ जानकी छट्टी गावात महाराष्ट्रातले सुमारे दीडशे पर्यटक अडकले आहेत. भारतीय हवामान विभागाने हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरात, राजस्थान तसंच महाराष्ट्राच्या काही भागांसह, उत्तर आणि मध्य भारतात पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. कोकण, गोवा,...

April 12, 2025 8:13 PM

views 20

उत्तराखंड ऋषिकेश बद्रीनाथ महामार्गावर झालेल्या अपघातात 5 जणांचा मृत्यू

उत्तराखंडतल्या टिहरी जिल्ह्यात ऋषिकेश बद्रीनाथ महामार्गावर गाडी अलकनंदा नदीत पडून झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. यात अपघातात जखमी झालेल्या महिलेला रुग्णालयात दाखल केलं आहे. मृतांमध्ये एक महिला, दोन लहान मुलं आणि दोघा पुरुषांचा समावेश आहे.

March 2, 2025 6:10 PM

views 24

Uttarakhand Avalanche: बचाव अभियान आज संपलं

उत्तराखंडच्या चमोली इथं मना इथं हिमस्खलनात अडकलेल्या कामगारांना वाचवण्यासाठी गेले तीन दिवस सुरू असलेलं बचाव अभियान आज संपलं. या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या एका कामगाराचा मृतदेह आज बाहेर काढण्यात आला. बाहेर काढलेल्या ५४ जणांपैकी ४६ जणांना वाचवण्यात यश आलं आहे, तर ८ जणांचा मृत्यू झाला आहे.    

January 12, 2025 7:22 PM

views 24

उत्तराखंडात झालेल्या बस अपघातात पाच जणांचा मृत्यू, अठराजण जखमी

उत्तराखंडात सिरौलीजवळ पावरी गढवाल जिल्ह्यात झालेल्या बस अपघातात पाच जण मृत्यूमुखी पडले तर अठरा जखमी झाले. जखमींना उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केलं आहे. मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त करुन जखमींना उपचार पुरवण्याची व्यवस्था करण्याबाबत प्रशासनाला निर्देश दिले आहेत.

December 26, 2024 9:14 AM

views 21

उत्तराखंडमधे बस दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू, २८ जण जखमी

उत्तराखंडमध्ये नैनिताल जिल्ह्यातील भीमताल इथं राज्य परिवहन महामंडळाची बस खोल दरीत कोसळल्याने ४ जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ जणांना घेऊन ही बस पिठोरागढहून हल्द्वानीला जात होती. २४ प्रवासी जखमी झाले असून त्यांना हल्द्वानी इथल्या सुशीला तिवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य पूर्ण करण्यात आले आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.