November 9, 2025 8:11 PM November 9, 2025 8:11 PM

views 19

उत्तराखंड राज्याचा आज २५वा स्थापना दिवस

उत्तराखंड राज्याचा आज २५वा स्थापना दिवस आहे. यानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत देहरादून इथं विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात प्रधानमंत्री मोदी यांनी विशेष टपाल तिकिटाचं प्रकाशन, उत्तराखंडमधल्या आठ हजार कोटी रुपयांच्या विकास कामांचं भूमीपूजन आणि उद्घाटन केलं. तसंच प्रधानमंत्री पीकविमा योजनेतून २८ हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ६२ हजार कोटी रुपये हस्तांतरित केले. गेल्या २५ वर्षांत उत्तराखंडचं चित्र पूर्णपणे पालटलं असून पायाभूत सुविधा, शिक्षण...

September 18, 2025 1:32 PM September 18, 2025 1:32 PM

views 12

Uttarakhand: मुसळधार पावसामुळे ७ जण अद्याप बेपत्ता

उत्तराखंडमध्ये, चमोली जिल्ह्यातल्या नंदनगर घाट परिसरात मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान झालं असून, कुंटरी लंगाफली प्रभागातली सहा घरं चिखलात गाडली गेल्याचं वृत्त आहे. आतापर्यंत २ जणांचा बचाव करण्यात यश मिळालं  असून, ७ जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिली. पूरग्रस्त भागात बचाव आणि मदत कार्य वेगाने सुरु असून, प्रशासन परिस्थितीकडे बारकाईने लक्ष ठेवत असल्याचं  मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी सांगितलं.    आंध्रप्रदेश, कर्नाटकचा किनारपट्टी प्रदेश, केरळ, तामिळनाडू, पुडु...

September 10, 2025 11:34 AM September 10, 2025 11:34 AM

views 37

गंगोत्री धाम यात्रेला अधिकृतपणे काल पुन्हा सुरुवात

उत्तराखंड मध्ये झालेल्या मुसळधार पावसानं उत्तरकाशी मध्ये हाहाकार माजवला आहे. या पार्श्वभूमीवर गंगोत्री धाम यात्रा बंद करण्यात आली होती, प्रशासनाच्या 35 दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर गंगोत्री धाम यात्रेला अधिकृतपणे काल पुन्हा सुरुवात झाली.   प्रशासन आणि सीमा रस्ता सुरक्षा संघटनांच्या मदतीन गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावरील नुकसान ग्रस्त भागांची दुरुस्ती करून यात्रा पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे. काल संध्याकाळी 100 पेक्षा अधिक भाविकांनी गंगा मातेचं दर्शन घेतलं.

August 23, 2025 12:58 PM August 23, 2025 12:58 PM

views 9

उत्तराखंडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांना जोरदार पावसाचा फटका

उत्तराखंडमध्ये, चामोली जिल्ह्यात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे थरली तालुक्यात मोठं नुकसान झाल्याचं वृत्त आहे. थरली तालुका मुख्यालय, केदारबागड, राडीबागड आणि चेपाडोसह अनेक भागांना जोरदार पावसाचा फटका बसला आहे.   निवासी इमारती, दुकानं आणि सरकारी कार्यालयांमध्ये पावसाच्या पाण्याबरोबर आलेला राडारोडा साचला आहे. अनेक वाहनांचंही नुकसान झालं आहे. विविध यंत्रणा मदत आणि बचावकार्यात गुंतल्या आहेत. दरम्यान, उत्तराखंडमध्ये सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असून, हवामान विभागानं डेहराडून, नैनिताल, बागेश्वर...

August 10, 2025 1:57 PM August 10, 2025 1:57 PM

views 15

उत्तराखंडमध्ये अद्याप मदत आणि बचावकार्य सुरू

उत्तराखंडमध्ये उत्तरकाशी जिल्ह्याच्या हरसिल आणि धराली भागांत अलिकडेच झालेल्या दुर्घटनेनंतर, अजुनही मोठ्या प्रमाणावर मदत, बचाव आणि शोधकार्य सुरू आहे. बचाव कार्यासाठी उत्तराखंड नागरी उड्डाण विकास प्राधिकरण आणि भारतीय लष्कराच्या हेलिकॉप्टरनी एकूण २५७ उड्डाणं केली असून, या दुर्घटनेनंतर, आतापर्यंत ११०० पेक्षा जास्त लोकांना सुरक्षित बाहेर काढलं आहे. वीज, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसचा नियमित पुरवठा सुरू केला गेला आहे, रस्ते बंद असल्यानं घोड्यांवरून खाद्यान्न पुरवठा केला जात आहे.   सर्व यंत्रणांनी ...

August 8, 2025 1:28 PM August 8, 2025 1:28 PM

views 11

उत्तराखंडमध्ये बचाव कार्य प्रगतीपथावर

उत्तराखंडमधे उत्तरकाशी इथं ढगफुटी आणि मुसळधार पावसामुळे दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेत बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. वातावरण निवळल्यावर अडकलेल्या लोकांना जलदगतीने बाहेर काढलं जाईल, असं सरकारनं म्हटलं आहे. आतापर्यंत ३७२ जणांना सुरक्षित बाहेर काढून आयटीबीपी कँपमधे हलवण्यात आलं आले. आतापर्यंत दोन मृतदेह सापडले असून ९ जवानांसह १६ जण बेपत्ता असल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं दिली आहे.    लोकांना बाहेर काढण्यासाठी यासाठी चिनुक आणि एम आय १७ विमानांची मदत घेतली जात आहे. अडकलेल...

July 2, 2025 2:07 PM July 2, 2025 2:07 PM

views 16

उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे अडकलेल्या महाराष्ट्रातल्या पर्यटकांना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मदत

उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे अडकलेल्या महाराष्ट्रातल्या पर्यटकांना मदत करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. भूस्खलनात परतीचा मार्ग वाहून गेल्यामुळे २८ जूनपासून उत्तराखंडमधील यमुनोत्री धामजवळ जानकी छट्टी गावात महाराष्ट्रातले सुमारे दीडशे पर्यटक अडकले आहेत. भारतीय हवामान विभागाने हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरात, राजस्थान तसंच महाराष्ट्राच्या काही भागांसह, उत्तर आणि मध्य भारतात पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. कोकण, गोवा,...

May 8, 2025 2:47 PM May 8, 2025 2:47 PM

views 21

उत्तराखंडमध्ये खासगी हेलिकॉप्टर कोसळून ६ जणांचा मृत्यू

उत्तराखंडमध्ये उत्तरकाशी जिल्ह्यात गंगनानी इथे आज सकाळी एक खासगी हेलिकॉप्टर कोसळून ६ जणांचा मृत्यू झाला असून १ जण गंभीर जखमी झाला आहे. या हेलिकॉप्टरमध्ये वैमानिकासह सात जण प्रवास करत होते.    डेहराडून इथल्या सहस्रधारा हेलिपॅडवरून निघालेलं हे हेलिकॉप्टर चारधाम यात्रेकरूंना घेऊन गंगोत्री इथे निघालं होतं. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून घटनेच्या  चौकशीचे निर्देश दिले आहेत. 

May 2, 2025 11:35 AM May 2, 2025 11:35 AM

views 25

उत्तराखंडमधल्या केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले

उत्तराखंडमधल्या केदारनाथ मंदिराचे दरवाजे आज उघडण्यात आले. हिवाळ्यात सहा महिने बंद राहिल्यानंतर आज मंदिराचे दरवाजे खुले करण्यात आले. मंदिर १०८ क्विंटल फुलांनी सजवण्यात आलं आहे. मुख्यमंत्री सीएम पुष्कर सिंह धामी यांनी सपत्नीक केदारनाथाचं दर्शन घेतलं.

April 29, 2025 9:48 AM April 29, 2025 9:48 AM

views 40

आजपासून चारधाम यात्रेच्या पार्श्वभूमीवर उत्तराखंड मधील सुरक्षा व्यवस्थेत वाढ

चार धाम यात्रा आजपासून सुरू होत असून उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी काल या यात्रेच्या व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी राज्यभरातील जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेतली. येत्या दोन मे पासून भाविकांना केदारनाथ धाममध्ये दर्शन घेता येणार आहे. चार धाम यात्रा 2025 साठीच्या  नोंदणीही कालपासून सुरू झाली.   दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक आणि परदेशी नागरिकांसाठी विशेष काऊंटर उभारण्यात येत आहेत. तसंच २० मोफत नोंदणी काऊंटर सुरू करण्यात आले आहेत, असं धामी यांनी आपल्या समाज माध्यमांवरील पोस्टमध्ये म्...