August 17, 2024 2:50 PM August 17, 2024 2:50 PM

views 10

उत्तर प्रदेशमध्ये कानपूर जिल्ह्यात साबरमती एक्सप्रेसचे २० डबे रुळावरून घसरले

उत्तर प्रदेशमध्ये कानपूर जिल्ह्यात साबरमती एक्सप्रेसचे २० डबे रुळावरून घसरले. ही गाडी वाराणसीहून अहमदाबादकडे जात असताना कानपूर रेल्वे स्थानकाजवळ आज पहाटे अडीचच्या सुमारास हा अपघात झाला. तीक्ष्ण वस्तूवर इंजिन आपटल्यामुळे डबे घसरल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात दिली आहे. या अपघातात जीवितहानी झाली नाही.

July 18, 2024 7:39 PM July 18, 2024 7:39 PM

views 6

उत्तरप्रदेश : गोंडा रेल्वे स्थानकाजवळ चंदीगड-दिब्रूगढ एक्सप्रेसचे २१ डबे रुळावरून घसरले

उत्तर प्रदेशातल्या मानकापूर विभागातल्या गोंडा रेल्वे स्थानकाजवळ चंदीगड-दिब्रूगढ एक्सप्रेसचे २३ पैकी २१ डबे आज रुळावरून घसरले. या अपघातात २ जण मरण पावले तर २० जण जखमी झाले. रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आणि जिल्हा स्थानिक प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. स्थानिकांच्या मदतीनं प्रशासनानं मदतकार्य सुरू केलं असून राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती निवारण दलांची मतपथके घटनास्थळी पोहोचली आहेत. या अपघातामुळे लखनऊ ते गुवाहाटी रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून अनेक रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आ...

July 10, 2024 3:18 PM July 10, 2024 3:18 PM

views 13

उत्तरप्रदेश : उन्नाव जिल्ह्यात झालेल्या अपघातात १८ जणांचा मृत्यू, १९ जखमी

उत्तर प्रदेशच्या उन्नाव जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या अपघातात किमान १८ जणांचा मृत्यू झाला असून १९ जण जखमी झाले आहेत. लखनौ-आग्रा द्रुतगती मार्गावरून जाणाऱ्या दुधाच्या टँकरला डबल डेकर बसनं धडक दिल्यानं हा अपघात झाला. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.    राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात अपघातातल्या मृतांच्या कुटुंबीयांप्रति सहवेदना  व्यक्त केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील दुर्घटनेविषयी दुःख व्यक्त केलं. मृतांच्या नातेव...