November 5, 2025 2:39 PM November 5, 2025 2:39 PM

views 11

उत्तर प्रदेशच्या ट्रेनखाली येऊन ६ जण ठार

उत्तर प्रदेशच्या मिर्झापूर जिल्ह्यात चुनार रेल्वेस्थानकाजवळ आज ट्रेनखाली येऊन सहा जण ठार झाले. ट्रेनमध्ये असलेल्या काही महिलांनी फलाटाच्याविरुद्ध बाजूनं उतरायचा प्रयत्न केला, त्यामुळे अपघात झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनानं दिली आहे. या दुर्घटनेत कुणीही गंभीर जखमी झालेलं नाही.

September 9, 2025 1:36 PM September 9, 2025 1:36 PM

views 11

उत्तर प्रदेशात पूर परिस्थिती कायम

उत्तर प्रदेशात प्रयागराज, आग्रा आणि मथुरा जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती कायम आहे. यमुना नदीला आलेल्या पुराचा सर्वाधिक फटका मथुरा जिल्ह्याला बसला असून नदीकाठच्या अनेक गावांमध्ये पाणी शिरलं आहे. पुरामुळे मथुरा जिल्ह्यातल्या शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली आहेत.   मथुरा जिल्ह्यातून ५ हजार जणांना मदत शिबिरांमध्ये हलवण्यात आलं आहे. आग्रा जिल्ह्यातही यमुनेला आलेल्या पुराचं पाणी ताजमहालाच्या परिसरात शिरलं आहे. प्रयागराज जिल्ह्यात गंगा आणि यमुना नद्यांना आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं ...

August 3, 2025 7:56 PM August 3, 2025 7:56 PM

views 3

Uttar Pradesh : गोंडा इथं झालेल्या अपघातात ११ जणांचा मृत्यू, ४ जखमी

उत्तर प्रदेशात गोंडा इथं आज सकाळी झालेल्या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले आहेत. पृथ्वीनाथ मंदिरात जाणाऱ्या १५ भाविकांनी भरलेल्या एक बोलेरो गाडीवरचं नियंत्रण सुटून ती रेहरा गावातल्या सरयू कालव्यात पडली. या कालव्यातून ४ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे.   प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

July 28, 2025 2:29 PM July 28, 2025 2:29 PM

views 8

Uttar Pradesh : औसनेश्वर मंदिरात चेंगराचेंगरी दोघांचा मृत्यू, १७ जखमी

उत्तरप्रदेशात बाराबंकी इथं औसनेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी झाल्यानं  दोघांचा मृत्यू झाला तर १७ जण जखमी झाले. श्रावण सोमवार निमित्त दर्शनासाठी जमलेल्या गर्दीवर विजेची तार कोसळून ही दुर्घटना झाली. उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याची घोषणा केली.    विजेच्या तारांवर वानराने उडी मारल्यामुळे तारा खाली कोसळल्या. त्यामुळे १९ जणाना विजेचा झटका लागला. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे.

June 30, 2025 1:40 PM June 30, 2025 1:40 PM

views 16

तंत्रज्ञानाच्या वापरामुळे पशुवैद्यकीय रुग्णालयांना सक्षम बनवता येईल- राष्ट्रपती

तंत्रज्ञानामध्ये इतर क्षेत्रांप्रमाणेच पशुवैद्यकीय औषधं आणि उपचारांमध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणण्याची क्षमता असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. त्या आज उत्तर प्रदेशात बरेली इथे पशुवैद्यकीय संशोधन संस्थेच्या दीक्षांत समारंभाला संबोधित करत होत्या. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे देशभरातल्या पशुवैद्यकीय रुग्णालयांना सक्षम बनवता येईल, असंही त्या यावेळी म्हणाल्या.    प्राण्यांची सेवा करणं ही नैतिक जबाबदारी असून पशुवैद्यांना त्यांच्या कामाप्रति वचनबद्ध राहावं असं आवाहनही त्यांनी...

May 30, 2025 1:15 PM May 30, 2025 1:15 PM

views 5

उत्तर प्रदेशात बस अपघातात ४ जणांचा मृत्यू, १५ जखमी

उत्तर प्रदेशातल्या जौनपूर जिल्ह्यात आज सकाळी बादलपूरहून जौनपूरला जाणारी एक खाजगी बस उलटल्यानं किमान चार जणांचा मृत्यू आणि १५ जण जखमी झाले आहेत. पोलिस अधीक्षक डॉ. कौस्तुभ यांनी यांनी ही माहिती दिली. प्रत्यक्षदर्शींच्या मते, बस सुमारे ८० किमी प्रतितास वेगाने धावत होती. तेव्हा चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला. काही प्रवाशांनी बाहेर पडण्यासाठी खिडक्यांच्या काचा फोडल्या, तर काही जण आतच अडकले, असं बचाव कार्यात मदत करणाऱ्या एका स्थानिक रहिवाशानं सांगितलं.

February 16, 2025 2:41 PM February 16, 2025 2:41 PM

views 24

उत्तरप्रदेशमध्ये रस्ता अपघातात ४ जणांचा मृत्यू

उत्तरप्रदेशात बाराबंकी इथं पूर्वांचल एक्सप्रेस वेवर आज पहाटे रस्ता अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला तर ६ पेक्षा जास्त जखमी झाले. महाराष्ट्रातून अयोध्येकडे चाललेली टेंपो ट्रॅव्हलर गाडी चालकाचं नियंत्रण सुटल्यानं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बसवर आदळून हा अपघात झाल्याचं समजतं. प्रवाशांपैकी एकाचा जागीच मृत्यू झाला तर ३ जण उपचारादरम्यान मरण पावले. मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरु आहे असं पोलिसांनी सांगितलं. 

January 28, 2025 1:32 PM January 28, 2025 1:32 PM

views 14

उत्तरप्रदेश : धार्मिक महोत्सवासाठी उभारलेला मंच कोसळल्याने ५ जणांचा मृत्यू, ४० जखमी

उत्तर प्रदेशातल्या बागपत इथं आज भगवान आदिनाथ निर्वाण लाडू महोत्सवासाठी उभारलेला मंच कोसळल्यानं पाच जणांचा मृत्यू झाला, तर ४० हून अधिक जण जखमी झाले. या महोत्सवासाठी तात्पुरत्या स्वरुपात या मंचाची उभारणी केली होती. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी भाविक या मंचावर चढले होते. मात्र, अचानक मंच कोसळला आणि घबराट पसरल्यामुळे सोहळ्यासाठी आलेल्या भाविकांची चेंगराचेंगरी झाली. दुर्घटनेतल्या जखमींना बरौत इथल्या विविध रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनास्थळी बचाव कार्य सुरू असून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांन...

January 12, 2025 1:55 PM January 12, 2025 1:55 PM

views 12

उत्तर प्रदेशात प्रयागराज तीर्थ इथे उद्यापासून सुरू होणाऱ्या महाकुंभ मेळ्यासाठी तयारी पूर्ण

उत्तर प्रदेशात प्रयागराज तीर्थ इथं उद्यापासून महाकुंभ मेळा सुरू होत असून उद्याच्या पौष पौर्णिमेच्या पुण्यकाळात पहिलं शाही स्नान होणार आहे.   यासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली असून भाविकांना या पर्व काळात शुद्ध हवेचा पुरवठा व्हावा यासाठी विशेष जंगल क्षेत्र विकसित करण्यात आली आहेत. गेल्या 2 वर्षात प्रयागराज शहरात १० ठिकाणी ५५ हजार चौरस मीटरवर ६३ प्रकारची १ लाख २० हजार झाडं लावून हे जंगल विकसित करण्यात आलं आहे.

December 23, 2024 12:42 PM December 23, 2024 12:42 PM

views 23

उत्तरप्रदेशात पोलिसांच्या चकमकीत तीन खलिस्तानी अतिरेकी ठार

उत्तर प्रदेशातल्या पिलभीत जिल्ह्यात आज सकाळी खलिस्तानी अतिरेकी आणि पोलिसांच्या चकमकीत तीन अतिरेकी ठार झाले. हे तिन्ही खलिस्तानवादी अतिरेकी १९ डिसेंबर रोजी पंजाबच्या गुरुदासपूर जिल्ह्यातल्या एका पोलीस चौकीवर झालेल्या हातबॉम्ब हल्ल्यात सहभागी होते. पिलभीत जवळच्या भागात खलिस्तानवादी अतिरेकी असल्याची माहिती मिळाल्यानंतर पंजाब आणि उत्तर प्रदेश या दोन्ही राज्याच्या पोलिसांनी संयुक्तपणे शोधमोहिम सुरु केली. पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी गोळीबार सुरु केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसां...