November 3, 2024 11:37 AM November 3, 2024 11:37 AM

views 7

अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष निवडण्यासाठी निवडणूक प्रचार शिगेला

अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष निवडण्यासाठी आता तीन दिवस शिल्लक असून तिथे निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला आहे. रिपब्लीकन पक्षाचे उमेदवार डोनल्ड ट्रंप आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या  उमेदवार कमला हॅरीस यांनी उत्तर कॅरोलिना आणि वर्जिनिया या निवडणुकीत महत्वाच्या असलेल्या राज्यांमध्ये काल ठिकठिकाणी प्रचारसभा घेतल्या. रिपब्लिकन्स पक्षाकरता हमखास विजयासाठी  उत्तर कॅरोलिना राज्य महत्वाचं असून डेमोक्रॅट समर्थक इथली बाजी पलटवण्यासाठी नेटानं प्रयत्न करत आहेत.