March 1, 2025 8:24 PM

views 15

वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची माफी मागावी – अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबीयो

चर्चेदरम्यान झालेल्या वादावादीसाठी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड  ट्रम्प यांची माफी मागायला हवी, असं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबीयो यांनी म्हटलं आहे. ट्रम्प यांना रशियाला वाटाघाटी करायला राजी करायचं असून रशिया - युक्रेन संघर्ष थांबवायचा आहे, असं रुबीयो म्हणाले.    व्हाईट हाऊस मधे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, उपराष्ट्राध्यक्ष जे डी व्हॅन्स यांची युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी काल रात्री झालेल्या चर्...

March 1, 2025 11:12 AM

views 20

अमेरिका- यूक्रेन दरम्यानची दुर्मिळ खनिजांवरील कराराची चर्चा निष्फळ

अमरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रंप आणि यूक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेंस्की यांच्या दरम्यान दुर्मिळ खनिजांवरील कराराची चर्चा निष्फळ ठरली. चर्चेनंतर ट्रंप यांनी बातमीदारांना सांगितलं की झेलेंस्की हे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा द्वेष करतात त्यामुळं झेलेंस्की यांच्यासोबत सहमती होणं कठीण आहे. तर झेलेंस्की यांनी रशियासोबत युद्धावर कोणतीही तडजोड करणं शक्य नाही असं ट्रंप यांना ठणकावून सांगितलं आणि करारावर स्वाक्षरी न करताच ते व्हाईट हाऊसमधून बाहेर पडले. नंतरची संयुक्त वार्ताहर परिषदही रद्द करण्या...

February 27, 2025 9:19 AM

views 33

युक्रेन-अमेरिकेदरम्यान खनिज भागीदारी करार आणि संरक्षणाची हमी यासाठी चर्चा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की उद्या व्हाईट हाऊसला भेट देतील आणि त्यांच्या देशातल्या दुर्मिळ खनिजांचा हक्क अमेरिकेला देणाऱ्या करारावर स्वाक्षरी करतील, असं जाहीर केलं आहे. युक्रेन युद्धावरही यावेळी एक करार करण्यात येईल. मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत उद्घाटनपर भाषणात अध्यक्ष ट्रम्प म्हणाले की, सर्व काही निश्चित झालं असून युद्धामध्ये लोकांची हत्या थांबवण्यासाठी रशिया आणि युक्रेनसोबत आपण करार करणार आहेत. युक्रेन युद्धाचा थेट परिणाम युरोप...

February 26, 2025 1:23 PM

views 23

युक्रेन-अमेरिकेची दुर्मिळ खनिजांच्या उत्खननासह व्यापक आर्थिक कराराबाबत सहमती

युक्रेन आणि अमेरिका यांनी दुर्मिळ खनिजांच्या उत्खननासह व्यापक आर्थिक कराराबाबत सहमती दर्शवली आहे. करारावर स्वाक्षरी केल्यानं युक्रेनला तातडीने अमेरिकेची लष्करी मदत मिळणार असल्याची आशा असल्य़ाचं युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. ट्रम्प प्रशासनानं अद्याप या करारावर कोणताही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की शुक्रवारी एका मोठ्या करारावर स्वाक्षरी करण्यासाठी अमेरिकेत येणार असल्याची माहिती ट्रम्प यांनी पत्रकारांनी दिली.

February 15, 2025 6:46 PM

views 17

अमेरिकी लष्करानं ट्रान्सजेंडर व्यक्तींची सैन्यातली भरती बंद केल्याची घोषणा

अमेरिकी लष्करानं पारलिंगी अर्थात ट्रान्सजेंडर व्यक्तींची सैन्यातली भरती बंद केली असल्याची घोषणा केली आहे. यापुढे लिंग बदलाच्या प्रक्रियेसाठी दिली जाणारी मदतही बंद करणार असल्याचंही अमेरिकेच्या लष्करानं समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. लिंगभाव ओळखीसंदर्भात अनिश्चिततेनं ग्रस्त अर्थात जेंडर डिस्फोरिया असलेल्या व्यक्तींना सन्मानानं वागवलं जाईल, आणि त्यांच्या देशसेवेच्या इच्छेबद्दलही लष्कराचा आदर कायम राहील असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.   अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २७ ...

February 14, 2025 3:14 PM

views 29

अमेरिकेचा दौरा आटोपून प्रधानमंत्री मायदेशी परतले

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपला दोन दिवसांचा अमेरिका दौरा आटपून आज मायदेशी परत यायला निघाले. याआधी ते फ्रान्सच्या तीन  दिवसांच्या दौऱ्यावर होते. आपल्या अमेरिकेच्या दौऱ्यात त्यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासह तिथल्या अनेक वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. ट्रम्प यांनी जानेवारी महिन्यात दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर  भारताबरोबरची ही पहिलीच द्विपक्षीय चर्चा होती.     प्रधानमंत्री मोदी यांच्या अमेरिका भेटीत दोन्ही देशांमध्ये व्यापार, उद्योग, संरक्षण आणि सुरक्षा, ऊर्जा, ...

February 14, 2025 10:23 AM

views 13

अमेरिका भेटीत प्रधानमंत्र्यांनी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मायकल वॉल्ट्झ यांची घेतली भेट

अमेरिका भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वॉशिंग्टन डीसी मध्ये अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मायकल वॉल्ट्झ यांचीही भेट घेतली. संरक्षण, तंत्रज्ञान आणि सुरक्षा या मुद्यांवर यावेळी सविस्तर चर्चा झाली. कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर्स आणि अवकाश तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रात परस्पर सहकार्याची मोठी क्षमता आहे,असं पंतप्रधान मोदी यांनी या भेटीनंतर समाजमध्यमावरील संदेशात म्हटलं आहे.   दरम्यान, मोदी यांनी अमेरिका दौऱ्यात भारतीय-अमेरिकन उद्योजक आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते विवेक रामास्वामी...

February 14, 2025 9:47 AM

views 15

प्रधानमंत्र्यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्याशी द्विपक्षीय चर्चा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज वॉशिंग्टन डीसी इथल्या व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या दुसऱ्या कार्यकाळातला प्रधानमंत्री मोदींचा हा पहिलाच अमेरिका दौरा आहे.   भारत आणि अमेरिका यांच्यातील धोरणात्मक भागीदारी यापुढंही सुरूच राहणार असून ट्रम्प यांनी दोन्ही देशातील संबंध अधिक दृढ करण्यासाठी मोलाचं योगदान दिलं आहे, असं मत मोदी यांनी व्यक्त केलं. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील ट्रम्प यां...

February 10, 2025 1:52 PM

views 21

अमेरिकेत आयात होणाऱ्या स्टील आणि अल्युमिनियम मालावर २५% शुल्क आकारण्याची घोषणा – डोनाल्ड ट्रम्प

कॅनडा आणि मेक्सिकोमधून अमेरिकेत आयात होणाऱ्या सर्व प्रकारच्या स्टील आणि अल्युमिनियम मालावर २५ टक्के शुल्क आकारण्याची घोषणा आज होणार आहे, अशी माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल प्रसारमाध्यमांना दिली. अर्थसंकल्पातली तूट भरून काढण्यासाठी हा चांगला उपाय असल्याचं ते म्हणाले.

February 2, 2025 1:23 PM

views 22

अमेरिकेविरोधात प्रत्युत्तरात्मक शुल्क टॅरिफ लावण्याची कॅनडाची घोषणा

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या करांना प्रतिसाद म्हणून, कॅनडाचे प्रधानमंत्री जस्टिन ट्रुडो यांनी देशात येणाऱ्या १५५ अब्ज डॉलर्सच्या अमेरिकन वस्तूंवर २५ टक्के कर लावायची घोषणा केली आहे. ओटावा इथं वार्ताहर परिषदेत बोलताना, ट्रूडो यांनी मंगळवारपासून ३० अब्ज डॉलर्सच्या अमेरिकन वस्तूंवर २५ टक्के कर लावायची घोषणा केली आणि २१ दिवसांत १२५ अब्ज डॉलर्सच्या अमेरिकन वस्तूंवर असाच कर लावायची घोषणा केली. या विषयावर विविध प्रातांचे प्रमुख आणि मंत्रिमंडळाशी चर्चा केली असून आणि मेक्सिकोचे अध्यक्...