March 28, 2025 12:14 PM

views 15

विनेझुएलाने गयानावर हल्ला केल्यास अमेरिका चोख प्रत्युत्तर देईल- मार्को रुबिओ

विनेझुएलाने गयानावर हल्ला केल्यास अमेरिका चोख प्रत्युत्तर देईल असा इशारा अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी दिला आहे. तेल आणि वायुंचा साठा असलेल्या भागासह दोनही प्रदेशांदरम्यान संघर्ष सुरु आहे. या पार्श्वभूमीवर रुबिओ यांनी हा इशारा दिला आहे. अमेरिकन परराष्ट्रमंत्री कॅरिबियनच्या तीन देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात काल गयाना इथं पोहोचले आहेत.   डोनाल्ड ट्रम्प प्रशासन या भागात ऊर्जा क्षेत्रातील श्रोतांसंदर्भात मुक्त व्यापाराला प्रोत्साहन देणं आणि बेकायदेशीर स्थलांतर, अंमली पदा...

March 27, 2025 9:43 AM

views 25

अमेरिका हा भारताचा सर्वात मोठा द्विपक्षीय व्यापार भागीदार देश

भारताच्या अमेरिकेसोबत व्यापार संबंध अधिक भक्कम करण्यासाठी गहन चर्चा- परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर यांची माहिती भारत आणि अमेरिका दरम्यान व्यापार संबंध अधिक मजबूत करण्यासाठी गहन चर्चा करण्यात येत असून ऊर्जानिर्मितीक्षेत्रात दोन्ही देशांचे संबंध अधिक दृढ आणि स्थिर करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहे.   भारताच्या दूरदर्शी विकासासाठी ते आवश्यक असल्याच परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी काल सांगितल. नवी दिल्लीत एशिया सोसायटीतर्फे आयोजित विशेष संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.   अमेरिकेच्...

March 25, 2025 3:27 PM

views 10

अमेरिकी अधिकाऱ्यांचं एक शिष्टमंडळ भारताच्या दौऱ्यावर

अमेरिकी अधिकाऱ्यांचं एक शिष्टमंडळ आज भारताच्या दौऱ्यावर येत आहे. यावेळी ते भारतीय अधिकाऱ्यांबरोबर व्यापारविषयक चर्चा करणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची सूत्रे घेतल्यानंतर त्यांनी अनेक देशांमधून येणाऱ्या सामानावर आयात शुल्क लावलं असून त्या संदर्भात दोन्ही देशांमधील अधिकाऱ्यांमध्ये चर्चा होईल. यावेळी दोन्ही देशांमध्ये काही व्यापारविषयक चर्चा होऊन काही वस्तूंवरील आयातशुल्कात सवलत मिळण्याची शक्यता आहे. 

March 20, 2025 1:16 PM

views 13

अमेरिकेची फेडरल रिझर्व्हने आधारभूत व्याजदर कायम ठेवण्याचा निर्णय

अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने आपला आधारभूत व्याजदर ४.२५ ते ४.५० टक्के या श्रेणीत कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. फेडरल रिझर्व्हने २०२५ या वर्षासाठी अमेरिकेचा महागाईचा दर जास्त, तर आर्थिक विकास दर कमी राहील असा अंदाजही वर्तवला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयात शुल्क वाढीच्या निर्णयानंतर उसळलेल्या जागतिक व्यापार युद्धाच्या पार्श्वभूमीवर फेडरल रिझर्व्हनं २०२५ या वर्षाचं  दुसरं पतधोरण जाहीर केलं आहे.

March 18, 2025 10:28 AM

views 23

युक्रेन संघर्ष संपवण्यासंदर्भात अमेरिका – रशियामध्ये चर्चा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात युक्रेन संघर्ष संपवण्याबाबत आज चर्चा होणार आहे. क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी या चर्चेविषयी तयारी सुरु आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी संध्याकाळी याबाबत घोषणा केली. युक्रेनमधील युद्ध संपवण्याच्या प्रयत्नांतील हा एक भाग असून जमीन आणि वीज प्रकल्प हे चर्चेचे प्रमुख विषय असतील असंही त्यांनी नमूद केलं आहे.

March 14, 2025 7:02 PM

views 23

अमेरिकेनं लादलेले निर्बंध हटवण्यासाठी चीन, रशिया आणि इराणची आण्विक चर्चेसाठी मागणी

चीन, रशिया आणि इराण या यांनी इराणवर अमेरिकेने लादलेले निर्बंध हटवण्यासाठी आणि आण्विक चर्चा पुन्हा सुरू करण्याची मागणी केली. या तिन्ही देशांच्या प्रतिनिधींनी बीजिंगमध्ये झालेल्या बैठकीत सर्व एकतर्फी बेकायदा निर्बंध उठण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. चीनचे उप परराष्ट्र मंत्री मा झाओक्सु, रशियाचे उप परराष्ट्र मंत्री रियाबकोव्ह सर्गेई अलेक्सेविच आणि इराणचे उप परराष्ट्र मंत्री काझेम गरीबाबादी यांनी एक संयुक्त निवेदन प्रसिद्ध केले. या निवेदनात परस्पर आदराच्या तत्त्वावर आधारित राजकीय सहभाग आणि संवाद हाच...

March 14, 2025 10:21 AM

views 12

अमेरिकेत नवजात बालकांच्या नागरिकत्वाच्या हक्कावरील निर्बंध अंशत: लागू करण्यास ट्रम्प यांची विनंती

अमेरिकेत जन्म झाल्यामुळे बालकांना मिळणाऱ्या नागरिकत्वाच्या हक्कावरील निर्बंध अंशत: लागू करण्यास परवानगी देण्याची विनंती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाला केली आहे. नव्या निर्बंधांनुसार, अमेरिकेत बेकायदेशीर रीत्या राहणाऱ्या लोकांच्या या वर्षीच्या 19 फेब्रुवारीनंतर जन्मलेल्या मुलांना अमेरिकेचं नागरिकत्व मिळणार नाही, असा नियम ट्रम्प प्रशासनानं आणला आहे. हा नियम आतापर्यंत काही राज्यांनीच लागू केला आहे.

March 11, 2025 6:04 PM

views 12

सौदी अरेबियात रशिया-यूक्रेन युद्धादरम्यान शांतता चर्चा

युक्रेन आणि रशियात सुरू असलेलं युद्ध थांबावं यासाठी सौदी अरेबियात जेद्दाह इथं युक्रेन आणि अमेरिकेदरम्यान उच्चस्तरीय चर्चेला आज सुरूवात झाली. या बैठकीत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ, युक्रेनचे अधिकारी आणि सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री सहभागी झाले आहेत.    काळ्या समुद्राच्या प्रदेशात युद्धविराम व्हावा असा आपला प्रस्ताव असेल, यामुळे जहाजांची ये जा सुरळीत होऊ शकेल अशी माहिती या युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी या बैठकीसाठी रवाना होण्यापूर्वी दिली होती. त्याचवेळी युक्रेनमधील दुर्मीळ खनिज संप...

March 11, 2025 3:14 PM

views 18

अमेरिका युक्रेन यांच्यात आज होणार चर्चा

अमेरिका युक्रेन यांच्यात आज सौदी अरेबियात चर्चा होणार आहे. सौदी अरेबियाचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांची काल संध्याकाळी जेद्दा इथं भेट घेतली.   रुबिओ रशिया युक्रेन युद्ध संपवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रयत्नांचा भाग म्हणून युक्रेनच्या शिष्टमंडळाची भेट घेणार असल्याचं अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. अमेरिका आणि युक्रेन यांच्यातल्या खनिज कराराबाबत तपश...

March 7, 2025 1:47 PM

views 16

अमेरिकेत अवैधरित्या राहणाऱ्या नागरिकांवर प्रशासनाची कारवाई

अमेरिकेत अवैधरित्या राहणाऱ्या नागरिकांवर ट्रम्प प्रशासनानं कारवाई सुरू केली आहे. या कारवाईत ताब्यात घेतलेल्या कुटुंबांना राहण्यासाठी टेक्सासच्या डिली इथं दक्षिण टेक्सास फॅमिली रेसिडेंशिअल सेंटर पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हे सेंटर सुरू करणाऱ्या एका ठेकेदारानं सांगितलं की, अमेरिकेच्या स्थलांतरित आणि सीमा शुल्क विभागाबरोबर करार केला आहे. हे सेंटर सुरू करण्याचा ट्रम्प प्रशासनाचा निर्णय स्थलांतरित धोरणानुसार आहे.