April 9, 2025 8:15 PM

views 9

भारत – अमेरिका परस्परांच्या हिताचा द्विपक्षीय व्यापार करार करण्याविषयी प्रयत्न – परराष्ट्र व्यवहार मंत्रालय

अमेरिकेने लादलेल्या अतिरीक्त आयात शुल्काचे काय परिणाम होतील याची पडताळणी भारत करत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. भारत आणि अमेरिका परस्परांच्या हिताचा द्विपक्षीय व्यापार करार करण्याविषयी प्रयत्न करत आहेत, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. भारतासाठी  अमेरिकेसोबतची जागतिक धोरणात्मक भागीदारी महत्वाची असून त्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचंही ते म्हणाले.  

April 8, 2025 9:26 AM

views 11

चीनच्या वस्तूंवर ५० % अतिरिक्त शुल्क आकारणार असल्याची अमेरिकेची घोषणा

चीनमध्ये आयात होणाऱ्या अमेरिकी उत्पादनांवर लादण्यात आलेलं आयात शुल्क जोवर कमी केलं जात नाही, तोवर अमेरिकेत आयात होणाऱ्या चीनच्या वस्तूंवर ५० टक्के अतिरिक्त शुल्क आकारलं जाईल अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी केली आहे. अमेरिकेच्या व्यापारी भागिदार असलेल्या सर्व देशांच्या उत्पादनांवर किमान १० टक्के कर लादण्यात येईल अशी घोषणा गेल्या बधवारी ट्रम्प यांनी केली होती. यामध्ये चिनी आयातीवर ३४ टक्के आयात शुल्क लादण्यात आलं आहे. दरम्यान, चीनमध्ये उत्पादित मालावर आयात शुल्काची वाढ करण्य...

April 6, 2025 8:41 PM

views 8

अमेरिकेची १० % कर वसूलीला सुरुवात

अमेरिकेनं कालपासून काही देशांकडून १० टक्के इतका कर वसूल करायला सुरुवात केली. ही कर आकारणी काल मध्यरात्रीपासून अमेरिकेतली बंदरं, विमानतळ, सीमा शुल्क गोदामांवर करण्यात येत आहे. या शुल्काची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या महिन्यात अधिकृत आदेश काढून केली होती. या निर्णयामुळे अमेरिकचे मित्र देश आणि अन्य देशांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती. ट्रम्प यांनी कॅनडा आणि मेक्सिकोवरून येणाऱ्या काही वस्तूंवर २५ टक्के इतकी कर आकारणी केली आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयांचे परिणाम जगभरातल...

April 4, 2025 8:27 PM

views 26

अमेरिकी वस्तुंच्या आयातीवर ३४ % अतिरिक्त शुल्क लादल्याची चीनची घोषणा

चीननं आज अमेरिकी वस्तुंच्या आयातीवर ३४ टक्के अतिरिक्त शुल्क लादल्याची घोषणा केली. त्यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांनी सुरु केलेलं व्यापारयुद्ध चिघळण्याची आणि मंदी येण्याची भीती वाढली आहे. या दोन आर्थिक महासत्तांमधली तेढ चीननं आणखी काही वस्तुंच्या निर्यातीवर निर्बंध जाहीर केल्यानं, तसंच जागतिक व्यापार संघटनेकडे तक्रार दाखल केल्यामुळे वाढली आहे. यावर्षाअखेरपर्यंत जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या खाईत सापडण्याची शक्यता ४० टक्के होती, ती आता ६० टक्क्यापर्यंत दिसू लागली असल्याचं जे पी मॉर्गन...

April 4, 2025 10:25 AM

views 19

अमेरिकी शेअर बाजारांमध्ये जोरदार घसरण

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापारी भागीदारी देशांमधून होणाऱ्या आयातीवर भरमसाठ कर लागू केल्यामुळे अमेरिकी शेअर बाजारांमध्ये जोरदार घसरण होऊन ते दोन वर्षातील नीचांकी पातळीवर आले.अमेरिकी रोखे बाजारांनी दुपारपर्यंत २ पूर्णांक सात लाख कोटी डॉलर्स बाजार भांडवल गमावल्याचं वॉल स्ट्रीटच्या बातमीत म्हटलं आहे.   डाऊ इंडस्ट्रियल्स बाजार निर्देशांकात १३ शे अंकांची घसरण झाली तर नॅसडॅक ६ टक्क्यांनी कोसळला तर डाऊ जोन्स दिवसअखेरीस जवळपास ४ टक्क्यांनी घसरला.तत्पूर्वी दिवसाच्या सुरुवातीला आशियापा...

April 3, 2025 3:15 PM

views 17

भारतातून आयात होणाऱ्या मालावर २६ % शुल्क आकारण्याची अमेरिकेची घोषणा

अमेरिकेत भारतातून आयात होणाऱ्या मालावर २६ टक्के शुल्क आकारण्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे.  भारतात अमेरिकी मालावर लावल्या जाणाऱ्या शुल्काचं प्रत्युत्तर म्हणून हे शुल्क आकारण्यात येणार असल्याचं त्यांनी पत्रकारपरिषदेत सांगितलं. इतरही अनेक देशांकडून अमेरिकेत आयात होणाऱ्या मालावर अशा प्रकारचं प्रत्युत्तर शुल्क अमेरिकेनं लावलं आहे. युरोपिय महासंघाकडून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर वीस टक्के तर ब्रिटनमधून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर दहा टक्के इतकं शुल्क लावण्यात आलं आहे....

April 2, 2025 12:48 PM

views 25

डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या नवीन कर लादण्याच्या घोषणेची अंमलबजावणी होणार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या नवीन कर लादण्याच्या घोषणेची अंमलबजावणी होणार असल्याचं अमेरिकेच्या अधिकृत सूत्रांनी सांगितलं आहे. व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या कॅरोलिन लेविट म्हणाल्या की, ट्रम्प यांच्या घोषणेनुसार अमेरिकन वस्तुंवर कर लावणाऱ्या देशांवर परस्पर कर लागू केले जातील.   तर वाहनांच्या आयातीवर २५ टक्के कर उद्यापासून लागू केला जाईल. यामुळे अमेरिकेच्या उत्पादन क्षेत्राला चालना देण्याचा हेतू असून इतर देशांकडून चालणाऱ्या अन्याय्य व्यापारासाठी ही एक प्रकारे शिक्षा ठरणा...

March 31, 2025 8:00 PM

views 23

अमेरिकेसोबतच्या अणुकराराला इराणचा नकार

इराणच्या अणुकार्यक्रमाविषयी चर्चा करण्याचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्म्प यांचा प्रस्ताव इराणने नाकारला आहे. ट्रम्प यांनी २०१८ मधे अणुकराराविषयीच्या चर्चेतून माघार घेतल्यानंतर ही चर्चा पुुढे सरकू शकली नाही.  ट्रम्प यांनी इराणवर नव्याने निर्बंध लादणार असल्याचं सांगितलं आहे. इराणवर लष्करी कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.  तर इराण प्रत्येक हल्ल्या चोख उत्तर देईल असं इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खोमेनी यांनी म्हटलं आहे. 

March 31, 2025 10:22 AM

views 19

अमेरिकेचा रशियावर तीव्र संताप

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनमधील सुरू असलेल्या युद्धाबद्दल रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याबद्दल पुतिन यांच्यावर टीका केली. रशिया युद्धबंदीला सहमत झाला नाही तर ते रशियन तेल खरेदी करणाऱ्या देशांवर 50 टक्क्यांपर्यंत शुल्क लादतील असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. तसच युद्ध सुरूच राहिल्या...

March 30, 2025 8:45 PM

views 24

इराणच्या आण्विक कार्यक्रमाबद्दल अमेरीकेशी थेट वाटाघाटीला इराणचा नकार

इराणच्या आण्विक कार्यक्रमाबद्दल अमेरीकेशी थेट वाटाघाटीला इराणने नकार दिला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी इराणला पाठवलेल्या पत्राला ओमान सल्तनतच्या माध्यमातून उत्तर देताना इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कन यांनी या वाटाघाटीत मध्यस्थ असण्याला मात्र संमती दर्शवली आहे. इराणने अण्विक अस्त्र मिळवणे इस्रायल आणि अमेरिकेला मान्य असणार नाही असं ट्रंप यांनी एका मुलाखतीत नमूद केलं होत. इराणच्या तेहरान आण्विक करारातून अमेरिकेने २०१८ मध्ये  एकतर्फी अंग काढून घेतले होते. त्यानंतर या वाटाघाटी थांबल्या होत...