May 22, 2025 2:51 PM

views 20

अमेरिका – इराणमधली चर्चेची पाचवी फेरी उद्या होणार

अमेरिका आणि इराण मधली चर्चेची पाचवी फेरी उद्या होणार आहे. ओमानचे परराष्ट्र मंत्री सय्यद बद्र बिन हमाद बिन हमुद अल्बुसैदी यांनी ही घोषणा केली. इराणच्या अणू कार्यक्रमावर अमेरिकेनं लागू केलेले निर्बंध हटवण्याबाबत चर्चेच्या या फेऱ्या सुरु आहेत. अमेरिकेकडून होत असलेल्या अवाजवी मागण्यांमुळे या चर्चेत सहभागी होण्याबाबतचा निर्णय इराणनं  अजूनही राखून ठेवल्याचं इराणचे परराष्ट्रमंत्री सय्यद अब्बास अरघची यांनी काल सांगितलं. आपल्या अणु कार्यक्रमाबाबत पारदर्शकता राखण्याची इराणची तयारी आहे, मात्र अमेरिकेकडून न...

May 20, 2025 10:03 AM

views 25

रशिया-युक्रेन युध्दबंदीसाठीच्या चर्चेला अमेरिका तयार

रशिया आणि युक्रेनदरम्यान लवकरच युध्दविरामासंदर्भात थेट चर्चा होईल आणि युध्द संपेल असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी समाजामाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. रशियाचे राष्ट्राध्याक्ष व्लादिमिर पुतीन यांच्या बरोबर दुरध्वनीद्वारे झालेल्या चर्चेनंतर दोनही देश चर्चेला तयार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.   रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनीही आपण युक्रेनसोबत संभाव्य शांतता करारावर काम करण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे. रशियानं बिनशर्त युद्धबंदी करावी असं आवाहन युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झ...

May 12, 2025 2:31 PM

views 9

 अमेरिकेत औषधांच्या किमती ३० ते ८० टक्क्यांनी कमी करण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय

 अमेरिकेत औषधांच्या किमती ३० ते ८० टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला आहे. इतर देशांच्या तुलनेत अमेरिकेत औषधांच्या किंमती अधिक आहेत. औषधनिर्मितीसाठीचं  संशोधन आणि विकास खर्चामुळे  किमती अधिक ठेवाव्या लागतात, असं सांगून औषधनिर्मिती कंपन्यांनी गेली कित्येक वर्ष अमेरिकन लोकांची फसवणूक केली आहे, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.   मात्र आता नवीन धोरणानुसार अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या औषधांची किंमत इतर कोणत्याही देशाने त्याच औषधासाठी दिलेल्या सर्वात कमी किंमतीइत...

May 6, 2025 2:47 PM

views 11

भारताच्या दहशतवादविरोधी लढ्याला अमेरिकेचा पाठिंबा

दहशतवादविरोधी लढ्यात अमेरिका भारताला सर्वतोपरी मदत करेल, असं अमेरिकेच्या संसदेचे अध्यक्ष माईक जॉन्सन यांनी म्हटलं आहे. भारत अमेरिकेचा महत्वपूर्ण भागीदार असल्याचंही ते म्हणाले. भारत आणि अमेरिकेदरम्यानच्या व्यापार कराराबाबतही त्यांनी विचार मांडले. दोन्ही देशाच्या व्यापार वाटाघाटी यशस्वी होतील, अशी अशा त्यांनी व्यक्त केली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर ट्रम्प प्रशासनानं भारताच्या दहशतवादविरोधी लढ्याला पाठिंबा दिला असल्याचं त्यांनी सांगितलं.

April 16, 2025 1:36 PM

views 11

अमेरिकेत प्रथमच वैशाखीचा सण साजरा

अमेरिकेत ऑलिंपिया इथल्या स्टेट कॅपिटलमध्ये प्रथमच वैशाखीचा सण साजरा करण्यात आला. सिएटलमधल्या भारतीय वाणिज्य दूतावासाने हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात वॉशिंग्टन राज्याचे गव्हर्नर, मंत्री तसंच वॉशिंग्टनमध्ये राहणाऱ्या शीख समुदायाचे प्रमुख सदस्य उपस्थित होते. वॉशिंग्टन राज्याचे गव्हर्नर बॉब फर्ग्युसन यांनी शीख समुदायाने अमेरिकेत दिलेल्या योगदानाचं आणि वैशाखी सणाच्या आयोजनाचं कौतुक केलं. तसंच, ग्रेटर सिएटल क्षेत्रात १४ एप्रिल हा दिवस वैशाखी दिन म्हणून साजरा करणार असल्याची घोषणा केली. 

April 13, 2025 2:27 PM

views 16

स्मार्टफोन, संगणक यांना सवलत देण्याची अमेरिकेची घोषणा

अमेरिकेने नव्याने जाहीर केलेल्या करांमधून स्मार्टफोन आणि संगणक यांना सवलत देण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेच्या जकात आणि सीमा सुरक्षा विभागाने दिलेल्या सुचनांनुसार, अमेरिकेत आयात होणाऱ्या या दोन्ही वस्तूंसाठी बहुतेक देशांसह चीनला देखील अतिरिक्त करातून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा फायदा सेमीकंडक्टर, सोलर सेल आणि मेमरी कार्डसह इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि घटक यामध्ये होणार आहे.

April 12, 2025 1:35 PM

views 7

३० दिवसांहून अधिक काळ वास्तव्यास असलेल्या परदेशी नागरिकांनी अमेरिकन सरकारकडे नोंदणी करणं अनिवार्य

अमेरिकेत ३० दिवसांहून अधिक काळ वास्तव्यास असलेल्या सर्व परदेशी नागरिकांनी संघीय सरकारकडे नोंदणी करणं अनिवार्य असल्याचं अमेरिकी सरकारनं स्पष्ट केलं आहे. याचे पालन न केल्यास त्यांना कठोर दंड, तुरुंगवास, तसंच हद्दपारीला सामोरं जावं लागेल असा इशारा दिला आहे.   नवीन नियमानुसार सर्व व्हिसा धारक आणि वैध कायम निवासी परदेशी नागरिकांना नोंदणीचे पुरावे स्वतःसोबत कायमस्वरूपी बाळगावे लागतील. अमेरिकेत ३० दिवसांहून अधिक काळ वास्तव्यास असलेल्या तसंच देशात नव्यानं प्रवेश केला असल्यास एका महिन्याच्या आत या स...

April 12, 2025 1:07 PM

views 21

अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची घेतली भेट

अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची सेंट पीटर्सबर्ग इथं भेट घेतली. यावेळी युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित करण्याबाबत त्यांच्यात चर्चा झाली. रशियाचे विशेष दूत किरील दिमित्रीव्ह यांनी ही चर्चा फलदायी झाल्याचं म्हटलं आहे. दरम्यान रशिया आणि युक्रेनमध्ये शांतता चर्चेला होत असलेल्या विलंबाबद्दल, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल निराशा व्यक्त केली. ट्रम्प यांनी रशियाला युक्रेनसोबत युद्धबंदीच्या चर्चेला गती देण्याचं आवाहन केलं आहे.

April 10, 2025 10:43 AM

views 15

चीन वगळता सर्व देशांसाठीच्या प्रत्युत्तर करावर ९० दिवसांचा विराम देण्याची अमेरिकेची घोषणा

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन वगळता सर्व देशांसाठीच्या प्रत्युत्तर करावर ९० दिवसांचा विराम देण्याची घोषणा केली आहे. एका समाज माध्यमावरील संदेशात, ९० दिवसांची ही सवलत प्रत्युत्तर करावर आणि १० टक्के करांवर लागू होईल असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. आमच्या कर योजनेचा भाग म्हणून या कराला ९० दिवसांचा विराम देण्यात येत आहे, मात्र चीनसाठीचा कर तात्काळ १२५ टक्क्यांपर्यंत वाढवत आहोत असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. चीनने जागतिक बाजारपेठेला दाखवलेल्या अनादरामुळे - अमेरिकेने चीनवर आकारलेला प्रत्युत्तर...

April 9, 2025 8:46 PM

views 14

अमेरिकेवरुन आयात होणाऱ्या वस्तूंवर ८४ % शुल्क लादण्याचा चीनचा निर्णय

अमेरिकेवरुन आयात होणाऱ्या वस्तूंवर अतिरीक्त ८४ टक्के शुल्क लादण्याचा निर्णय चीननं घेतला आहे. उद्या मध्यरात्रीपासून याची अंमलबजावणी होईल, असं चीनच्या अर्थमंत्रालयानं जाहीर केलं आहे.    अमेरिकेनं चीनी उत्पादनांवर १०४ टक्के आयात शुल्क लादल्यानंतर चीननं हा निर्णय घेतला आहे. अमेरिकन जागतिक व्यापार व्यवस्थेला गंभीर हानी पोहोचवली आहे, यामुळे जागतिक औद्योगिक पुरवठा साखळी, स्थैर्य आणि सुरक्षा धोक्यात आल्याचं चीननं प्रसिद्ध केलेल्या श्वेत पत्रिकेत म्हटलं आहे.    हा मुद्दा सोडवण्यासाठी अमेरिकेसोब...