July 4, 2025 12:10 PM

views 23

अमेरिकन काँग्रेसने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, सादर केलेलं कर आणि खर्च विधेयक केलं मंजूर

अमेरिकन काँग्रेसने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, सादर केलेलं कर आणि खर्च विधेयक मंजूर केलं आहे. काल रात्री झालेल्या सत्रात प्रतिनिधी सभागृहाने 218 विरुद्ध 214 अशा मतांनी हे विधेयक मंजूर केलं. यामुळे काही प्रमाणात कर कमी होतील, लष्करावरील खर्च वाढेल आणि मेडिकेड, एसएनएपी आणि स्वच्छ ऊर्जा निधीमध्ये मोठी कपात होईल.  

June 24, 2025 9:34 AM

views 18

इराण – इस्त्रायलची युद्धबंदीसाठी सहमती झाल्याचा अमेरिकेचा दावा इराणनं फेटाळला

इराण आणि इस्रायलनं संपूर्ण युद्धबंदीबाबत सहमती दर्शविली असून, येत्या काही तासांत ती लागू होईल, अशी घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल रात्री केली. कतारमधील अमेरिकेच्या हवाई तळावर इराणी क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर काही वेळातच ही घोषणा करण्यात आली. युद्धबंदी टप्प्याटप्प्याने लागू केली जाईल. इराण युद्धबंदी सुरू करेल, त्यानंतर इस्रायल 12 व्या तासाला युद्धबंदी करेल आणि त्यानंतर 12 दिवसांच्या युद्धाची अधिकृत समाप्ती होईल, असं ट्रम्प यांनी निवेदनात म्हटलं आहे.   दरम्यान, इराणचे परराष्ट्...

June 13, 2025 10:35 AM

views 15

अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याचं परराष्ट्र मंत्रालयाचं आवाहन

अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांना योग्य ती सुरक्षा खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. लॉस एंजेलिसमधील परिस्थितीबद्दल काल नवी दिल्लीत माध्यमांशी बोलताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी हे आवाहन केलं. सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय वाणिज्य दूतावास परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि भारतीय समुदायाच्या सदस्यांशी संपर्कात आहे, असंही ते म्हणाले.

June 11, 2025 3:25 PM

views 33

व्यापारातला तणाव कमी करण्यासाठीच्या प्राथमिक आराखड्यावर अमेरिका आणि चीन यांच्यात सहमती

व्यापारातला तणाव कमी करण्यासाठीच्या प्राथमिक आराखड्यावर अमेरिका आणि चीन यांच्यात सहमती झाली आहे. अमेरिका आणि चीनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये लंडनमध्ये २ दिवस झालेल्या चर्चेनंतर ही सहमती झाली आहे. आता या व्यापार कराराचा आराखडा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांना मंजुरीसाठी सादर केला जाणार आहे. 

June 5, 2025 9:43 AM

views 73

अमेरिका आणि रशिया यांच्यात दीर्घ चर्चा

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी दीर्घ चर्चा केली. मात्र, या त्यातून युक्रेनमध्ये तातडीनं शांतता होणार नाही, असं पुतिन यांनी मान्य केलं. तसंच युक्रेननं रशियाच्या विमानतळांवर केलेल्या हल्ल्याला रशिया उत्तर देईल असा इशाराही दिला. दोन्ही नेत्यांमध्ये 85 मिनिटं चर्चा झाली. ही चर्चा चांगली झाली, मात्र त्यातून लगेच शांतता प्रस्थापित होणार नाही, असं ट्रम्प यांनीही मान्य केलं. दरम्यान पुतिन यांनी काल सहकारी पक्षांबरोबर झालेल्या एका बैठकीत युक्रेनबरोबर सर्वस...

June 1, 2025 10:05 AM

views 20

तैवानला चीनकडून धोका असल्याचा अमेरिकेचा इशारा

अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी तैवानला चीनकडून लवकरच धोका निर्माण होणार असल्याचा इशारा दिला आहे. सिंगापूरमधील शांग्री-ला संवादात बोलताना हेगसेथ यांनी इशारा दिला की चीन आशियातील अनेक भागांवर वर्चस्व गाजवण्यासाठी आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याच्या आशेनं एक वर्चस्ववादी शक्ती बनण्याचा प्रयत्न करीत आहे.   अध्यक्ष शी जिनपिंग यांनी तैवानवर आक्रमण करण्यासाठी चिनी सैन्याला 2027 पर्यंतची अंतिम मुदत दिली आहे असा दावा करून, अमेरिकेच्या संरक्षण सचिवांनी आशियाई देशांना संरक्षण खर्च वाढवण्याचं ...

May 28, 2025 1:33 PM

views 15

परदेशी विद्यार्थ्यांसाठी नवीन व्हिसा मुलाखतींचं वेळापत्रक बंद करण्याचे अमेरिकेचे आदेश

परदेशी विद्यार्थ्यांसाठी नवीन व्हिसासाठी मुलाखत घेण्याची प्रक्रिया थांबवावी असं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी अमेरिकन दुतावास आणि काऊन्सलर कार्यालयांना सांगितलं आहे. यामुळे अमेरिकेतल्या शाळा, महाविद्यालयात इतर देशातल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्यात मर्यादा येणार आहेत. यापूर्वी ट्रम्प प्रशासनानं हावर्ड विद्यापीठाला परदेशातल्या विद्यार्थ्यांची नोंदणी करून घेऊ नये असं सांगितलं होतं.

May 28, 2025 12:22 PM

views 18

परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी घेतली अमेरिकेचे अंडर सेक्रेटरी जेफ्री केसलर यांची भेट

परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी अमेरिकेचे अंडर सेक्रेटरी जेफ्री केसलर यांची वॉशिंग्टन इथं आज भेट घेतली. दोन्ही देशात महत्त्वाच्या तसंच तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्याबाबत दोघांमधे चर्चा झाली.  भारत आणि अमेरिका यांच्यातले व्यापार संबंध अधिक दृढ व्हावेत यासाठी भारत-अमेरिका धोरणात्मक व्यापार संवाद करण्याबाबतही दोघांमधे चर्चा झाली. विक्रम मिसरी हे तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर असून ते ट्रम्प प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. 

May 28, 2025 12:12 PM

views 13

विद्यार्थ्यांसाठी नवीन व्हिसासाठी मुलाखत घेण्याची प्रक्रिया थांबवावी – अमेरिका

विद्यार्थ्यांसाठी नवीन व्हिसासाठी मुलाखत घेण्याची प्रक्रिया थांबवावी असं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी अमेरिकन दुतावास आणि काऊन्सलर कार्यालयांना सांगितलं आहे. यामुळे अमेरिकेतल्या शाळा, महाविद्यालयात इतर देशातल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्यात मर्यादा येणार आहेत. यापूर्वी ट्रम्प प्रशासनानं हावर्ड विद्यापीठाला परदेशातल्या विद्यार्थ्यांची नोंदणी करून घेऊ नये असं सांगितलं होतं. 

May 23, 2025 11:33 AM

views 9

अमेरिका आणि इराण यांच्यातील अप्रत्यक्ष चर्चेची पाचवी फेरी आज रोम इथं

अमेरिका आणि इराण यांच्यातील अप्रत्यक्ष चर्चेची पाचवी फेरी आज रोम इथं आयोजित करण्यात आली आहे. ओमानचे परराष्ट्र मंत्री सय्यद बद्र बिन हमद बिन हमूद अल्बुसैदी यांनी ही घोषणा केली. एप्रिलपासून आतापर्यंत झालेल्या चर्चेच्या चार फेऱ्यांपैकी तीन मस्कतमध्ये तर एक रोममध्ये पार पडल्या.   इराणचा अणुकार्यक्रम आणि अमेरिकेनं अद्यापही न हटविलेले निर्बंध यामुळे रेंगाळलेली राजनैतिक स्तरावरील बोलणी पुन्हा सुरू करण्याच्या उद्देशानं ओमाननं या चर्चेचं आयोजन केलं आहे.