October 17, 2025 3:14 PM
36
H1B विजासंदर्भात ट्रम्प यांच्या निर्णयाला अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सकडून न्यायालयात आव्हान
अमेरिकेत उच्च कुशल परदेशी कामगारांसाठी नवीन H-1B व्हिसावर एक लाख डॉलर्स शुल्क आकारण्याच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाला अमेरिकेच्या चेंबर ऑफ कॉमर्सने न्यायालयात आव्हान दिलं आहे. या शुल्कामुळे H-1Bवर अवलंबून असलेल्या व्यवसायांना त्यांच्या कामगार खर्चात लक्षणीय वाढ करणं किंवा कौशल्य कमी असलेल्या कामगारांना कामावर ठेवणं यापैकी एकाची निवड करावी लागेल, असं चेंबर ऑफ कॉमर्सचं म्हणणं आहे. कॅलिफोर्निया इथल्या फेडरल न्यायालयात विविध संघटना आणि गटांकडून या निर्णयाला आव्हान दिलं जात आहे.