November 18, 2025 1:40 PM
23
गाझापट्टीत शांतता आणि पुनर्निर्माणासाठी अमेरिकेच्या प्रस्तावाला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत मंजुरी
गाझापट्टीत शांतता प्रस्थापित करणं आणि उद्ध्वस्त झालेल्या भागांचं पुनर्निर्माण करण्याचा अमेरिकेचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पारीत झाला आहे. १५ सदस्यीय परिषदेत १३ जणांनी प्रस्तावाच्या बाजूने मतदान केलं तर रशिया आणि चीनने मतदानात सहभाग घेतला नाही. या प्रस्तावानुसार आता शांतता समितीची तसंच आंतरराष्ट्रीय स्थैर्य दलाची स्थापना केली जाईल. शांतता समितीचं अध्यक्षपद आपण भूषवणार असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं. आंतरराष्ट्रीय स्थैर्य दलामधे विविध देशांच...