April 22, 2025 1:37 PM April 22, 2025 1:37 PM

views 21

अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स भारत दौऱ्यावर: आमेर किल्ल्याला दिली भेट

अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स सध्या भारताच्या दौऱ्यावर असून आज त्यांनी जयपूर मध्ये आमेर किल्ल्याला आपल्या कुटुंबासह भेट दिली. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनल शर्मा आणि उपमुख्यमंत्री दिया कुमारी यांनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी राजस्थानची दिमाखदार लोकसंस्कृती प्रदर्शित करणारा कच्ची घोडी, घूमर आणि कालबेलिया या लोकनृत्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.  अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स आज दुपारी जयपूरमध्ये 'भारत-अमेरिका व्यापार संबंधांचं भविष्य' या विषयावरच्या व्यावसायिक परिषदेला संबोधित करती...