August 6, 2025 8:25 PM August 6, 2025 8:25 PM

views 9

अमेरिकन भारतावर अतिरीक्त २५ टक्के आयात शुल्क लादलं

रशियाकडून तेल आयात सुरूच ठेवल्यानं अमेरिकन भारतावर अतिरीक्त २५ टक्के आयात शुल्क लादलं आहे. यासंदर्भातल्या आदेशावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज स्वाक्षरी केली. गेल्याच आठवड्यात त्यांनी विद्यमान करांच्या व्यतिरीक्त २५ टक्के आयात शुल्क लादण्याचा निर्णय जाहीर केला होता. हा निर्णय उद्यापासून लागू होईल. आजच्या आदेशामुळं यामुळं भारतातून अमेरिकेत निर्यात होण्याऱ्या वस्तूंवर एकूण अतिरीक्त ५० टक्के कर द्यावा लागेल.    भारतानं किंवा रशियानं धोरणात बदल केला तर किंवा परिस्थिती बदलली ...

July 31, 2025 8:02 PM July 31, 2025 8:02 PM

views 9

अमेरिकेनं भारतावर लादलेल्या २५% आयात शुल्काबाबत मंत्री पीयूष गोयल यांचं निवेदन

अमेरिकेनं भारतावर लादलेल्या  २५ टक्के आयात शुल्काबाबत वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी संसदेत निवेदन केलं. अमेरिकेनं भारताच्या निर्यातीवर केलेल्या शुल्कवाढीच्या परिणामांची तपासणी सरकार करत असून देशाचं हित जपण्यासाठी आवश्यक पावलं उचलली जातील, असं त्यांनी सांगितलं. याविषयी शेतकरी, उद्योजक, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग संस्थांशी चर्चा केली जाईल, असंही गोयल म्हणाले.  अमेरिका आणि भारत यांच्यात समतोल, दोघांनाही फायदा होईल असा व्यापार करार करण्यासाठी गेल्या काही महिन्यापासून दोन्ही देशात चर्चा सुरू आहे...

July 10, 2025 9:20 AM July 10, 2025 9:20 AM

views 9

आठ देशांवर नवीन कर लागू करण्याची अमेरिकेची घोषणा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्राझील, श्रीलंका, अल्जेरिया, इराक, लिबिया, फिलीपिन्स, मोल्दोव्हा आणि ब्रुनेई या आठ देशांमधून येणाऱ्या वस्तूंच्या आयातींवर नवीन आयातशुल्क आकारण्याची घोषणा केली आहे. हे शुल्क 1 ऑगस्टपासून लागू होतील. ब्राझीलला सर्वाधिक 50 टक्के शुल्क आकारण्यात आले आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी या राष्ट्रांच्या नेत्यांना पाठवलेल्या पत्रांमध्ये आयातशुल्क वाढीबाबत माहिती देण्यात आली आहे.   कोणत्या देशाला किती आयातशुल्क :    ब्राझील : ५०%    श्रीलंका, इर...

May 6, 2025 1:24 PM May 6, 2025 1:24 PM

views 18

परदेशी बनावटीच्या चित्रपटांवरचं अमेरिकेचं शुल्क अन्यायकारक – ऑस्ट्रेलिया

परदेशी बनावटीच्या चित्रपटांवर अमेरिकेनं लावलेलं शुल्क अन्यायकारक असल्याचं ऑस्ट्रेलियाचे सामाजिक सेवा मंत्री अमांडा रिशवर्थ यांनी सांगितलं. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल अमेरिकेबाहेर तयार होणाऱ्या चित्रपटांवर १०० टक्के शुल्क लावण्याची घोषणा केली होती. ऑस्ट्रेलियाच्या निवडणुकीत लेबर पक्षाच्या विजयानंतर प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांनी नवीन सरकार अमेरिकेसमोर शुल्कांविरोधात बाजू मांडेल असं म्हटलं आहे.