June 22, 2025 7:52 PM June 22, 2025 7:52 PM

views 18

इराणच्या अण्वस्त्र तळांवर अमेरिकेच्या हल्ल्यानंतर हवाई प्रवासात व्यत्यय

अमेरिकेने इराणच्या अण्वस्त्र तळांवर हवाई हल्ले केल्यानंतर पश्चिम आशियातल्या हवाई प्रवासात मोठ्या प्रमाणात व्यत्यय येत आहेत. सुरक्षा, विलंब, उड्डाणाच्या वेळापत्रकात होणारे बदल आणि त्यामुळे वाढता खर्च या कारणांमुळे विमान कंपन्या आता या प्रदेशाचं हवाई क्षेत्र टाळत आहेत. इराण, इराक, सीरिया आणि इस्रायल या देशांवरून उड्डाणं टाळण्यासाठी विमानांचे मार्ग बदलले जात आहेत. या देशांच्या हवाई क्षेत्रांऐवजी कॅस्पियन समुद्र, इजिप्त किंवा सौदी अरेबियासारख्या सुरक्षित क्षेत्रांचा पर्याय निवडला जात आहे. त्यामुळे इ...

June 22, 2025 1:47 PM June 22, 2025 1:47 PM

views 15

इस्रायलने केलं अमेरिकेच्या कारवाईचं स्वागत, संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केली चिंता

इराणच्या अण्वस्त्र तळांवर हल्ला करण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाबद्दल इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं अभिनंदन केलं आहे. नेतन्याहू यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून ट्रम्प यांचं कौतुक केलं.    दरम्यान, संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी अमेरिकेच्या इराणवरच्या हल्ल्यांमुळे पश्चिम आशियातला संघर्ष नियंत्रणाबाहेर जाऊ शकतो, असा इशारा दिला आहे. अमेरिकेचे हल्ले हा आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेसाठी एक मोठा धोका असल्याचं गुटेरस या...

June 22, 2025 7:37 PM June 22, 2025 7:37 PM

views 14

अमेरिकेच्या हल्ल्यांचा इराणकडून तीव्र निषेध

अमेरिकेनं इराणच्या तीन आण्विक तळांवर केलेल्या हल्ल्यांचा इराणनं तीव्र निषेध केला आहे. अमेरिकी सैन्यानं केलेला हल्ला आंतरराष्ट्रीय कायदा, संयुक्त राष्ट्रांची सनद आणि अण्वस्त्र प्रसार विरोधी कायद्याचं उल्लंघन करणारा आहे, असं इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सईद अब्बास अराघची यांनी म्हटलं आहे. या हल्ल्याचे परिणाम दीर्घकाळ राहतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.    अमेरिकेनं हल्ला केलेल्या फोर्डो, नतांज आणि एस्फहान इथं निवासी भागात कुठलाही धोका असल्याचं किरणोत्सार प्रणाली डेटा आणि क्षेत्रीय सर्वेक...