November 11, 2025 7:45 PM November 11, 2025 7:45 PM

views 18

गव्हर्नमेंट शटडाऊन उठवण्यासाठी अमेरिकेतल्या सिनेटचं विधेयक मंजूर

गव्हर्नमेंट शटडाऊन उठवण्यासाठी अमेरिकेतल्या सिनेटने आज विधेयक मंजूर केलं. ६० विरूद्ध ४० मतांनी हे विधेयक मंजूर झालं. या विधेयकावर उद्या हाऊस ऑफ रिप्रेझंटेटिव्हज् मधे मतदान होणार आहे. स्टॉपगॅप फंडिंग विधेयकामुळे सरकारला ३० जानेवारीपर्यंत निधी मिळू शकेल. रिपब्लिकन पक्षाने आणलेल्या विधेयकाला डेमोक्रॅटिक पक्षाने विरोध केल्यामुळे १ ऑक्टोबरला गव्हर्नमेंट शटडाऊन करण्यात आलं होतं.