January 6, 2025 8:12 PM

views 14

अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर तेल किंवा नैसर्गिक वायू उत्खननावर बंदी

अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर तेल किंवा नैसर्गिक वायूच्या उत्खननावर  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी बंदी जाहीर केली आहे. या आदेशात अमेरिकेच्या अटलांटिक आणि पॅसिफिक समुद्रकिनाऱ्याच्या काही भागाचा,  मेक्सिकोचे आखात तसेच अलास्काजवळच्या बेरिंग समुद्राकडील  किनारपट्टीचा समावेश आहे.   बायडेन सरकारच्या शेवटच्या काही दिवसात घेतलेल्या पर्यावरण पूरक निर्णयांमध्ये या आदेशाचा समावेश आहे. लवकरच पदभार स्वीकारणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प  यांनी आपल्या निवडणूक प्रचारात अमेरिकेच्या पेट्रोलियम गरजांसाठी द...

September 22, 2024 8:23 PM

views 14

भारतातून चोरीला गेलेल्या किंवा तस्करी झालेल्या २९७ पुरातन वस्तू अमेरिका भारताला परत करणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने भारतातून चोरीला गेलेल्या किंवा तस्करी झालेल्या २९७ पुरातन वस्तू अमेरिका भारताला परत करणार आहे. लवकरच या वस्तू भारतात परत आणल्या जातील. डेलावेर इथं झालेल्या द्विपक्षीय बैठकीवेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांना यातल्या काही वस्तू दाखवण्यात आल्या. या वस्तू परत केल्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी बायडेन यांचे आभार मानले.

August 2, 2024 3:32 PM

views 29

इस्रायलमध्ये अमेरिकन लष्कर तैनात करण्यासंदर्भात अमेरिका आणि इस्रायल यांच्यात चर्चा

इस्रायलमध्ये अमेरिकन लष्कर तैनात करण्यासंदर्भात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी काल इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेत्यन्याहू यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली. इस्रायलवर हल्ले करण्याची धमकी इराणने दिली होती. या पार्श्वभूमीवर ही चर्चा झाली. इराण किंवा हमासच्या संभाव्य हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर इस्रायलला सर्वतोपरी मदत करण्यासाठी अमेरिका कटीबद्ध असल्याचं व्हाईट हाऊसनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.  

July 22, 2024 1:41 PM

views 15

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून जो बायडेन यांची माघार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी येत्या नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. बायडेन यांनी काल समाजमाध्यमावर ही घोषणा केली. तसंच त्यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उप राष्ट्राध्यक्ष कमला हॅरीस यांना आपला पाठिंबा जाहीर केला. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणून काम करणं ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट असून डेमॉक्रॅटिक पार्टी आणि देशाच्या हितासाठी अध्यक्षपदाच्या उर्वरीत काळात आपलं कर्तव्य पूर्ण करण्यावर लक्ष देणार असल्याचं बायडेन म्हणाले. या आठवड्याच्या शेवटी आपण दे...