November 18, 2025 7:17 PM November 18, 2025 7:17 PM

views 15

व्हेनेझुएलामध्ये अमेरिकी लष्कर तैनात करायचा पर्याय अद्यापही खुला-डोनाल्ड ट्रम्प

व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलास माडूरो यांच्याशी चर्चा करायला तयार असल्याचे संकेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहेत. त्याचवेळी, व्हेनेझुएलामध्ये अमेरिकी लष्कर तैनात करायचा पर्याय अद्यापही खुला असल्याचंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये अमेरिकेनं व्हेनेझुएला आणि मेक्सिकोमधून काम करणाऱ्या अंमली पदार्थ तस्करांवर कारवाईसाठी कॅरिबियनमध्ये लष्कराचं प्रमाण वाढवल्यानंतर दोन्ही देशांमधले संबंध ताणले गेले आहेत. अमेरिकेच्या हल्ल्यांमध्ये व्हेनेझुएलाचे अनेक खलाशी मृत्यूमुखी प...

September 19, 2025 10:16 AM September 19, 2025 10:16 AM

views 16

अफगाणिस्तानमधील बागराम हवाई तळ ताब्यात घेण्यासाठी अमेरिकेकडून प्रयत्न सुरू

अफगाणिस्तानमधील बागराम हवाई तळ ताब्यात घेण्यासाठी अमेरिकेकडून प्रयत्न सुरू असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी काल सांगितलं. अमेरिकेनं या तळावरचं नियंत्रण सोडल्यानंतर तालिबाननं अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवलं होतं. हा विमानतळ चीनच्या अण्वस्त्र केंद्रांच्या जवऱळ असल्यामुळं अमेरिकेला त्याच्यावर नियंत्रण हवं आहे असं ट्रंप म्हणाले. ब्रिटनचे पंतप्रधान केर स्टार्मर यांच्यासह लंडनमध्ये पत्रकार परिषदेत ट्रंप बोलत होते. अमेरिकेनं अफगाणिस्तानवरचा ताबा सोडणं हा अमेरिकेच्या इतिहासातील काळा अध्याय अ...

July 4, 2025 12:10 PM July 4, 2025 12:10 PM

views 17

अमेरिकन काँग्रेसने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, सादर केलेलं कर आणि खर्च विधेयक केलं मंजूर

अमेरिकन काँग्रेसने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, सादर केलेलं कर आणि खर्च विधेयक मंजूर केलं आहे. काल रात्री झालेल्या सत्रात प्रतिनिधी सभागृहाने 218 विरुद्ध 214 अशा मतांनी हे विधेयक मंजूर केलं. यामुळे काही प्रमाणात कर कमी होतील, लष्करावरील खर्च वाढेल आणि मेडिकेड, एसएनएपी आणि स्वच्छ ऊर्जा निधीमध्ये मोठी कपात होईल.  

June 27, 2025 1:37 PM June 27, 2025 1:37 PM

views 20

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षाने एक गुप्तचर अहवाल उघड केल्याचा आरोप

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षाने एक गुप्तचर अहवाल उघड केल्याचा आरोप केला आहे. अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात इराणच्या अण्वस्त्र सुविधा पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत, या ट्रम्प प्रशासनाच्या दाव्याचं या अहवालात खंडन करण्यात आलं आहे. अमेरिकन संरक्षण गुप्तचर संस्थेचा अहवालानुसार या हल्ल्यांमुळे इराणचा अणुकार्यक्रमाला काही महिने विलंब होणार असल्याचं दोन आघाडीच्या अमेरिकन माध्यमांनी उघड केलं आहे. तसंच हल्ल्यांपूर्वी इराणच्या समृद्ध युरेनियम साठ्याचा बराचसा भाग हलवण्यात आला होता...

June 27, 2025 11:12 AM June 27, 2025 11:12 AM

views 14

भारतासोबत लवकरच एक खूप मोठा करार करण्यात येणार – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

भारतासोबत लवकरच एक खूप मोठा करार करण्यात येणार असल्याचं काल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं. अमेरिकेनं चीनसोबत एक करार केला असून लवकरच भारतासोबत एक मोठा करार होईल. इतर कोणत्याही देशासोबत करार केले जाणार नाहीत, असं ट्रम्प यांनी ठामपणे सांगितलं. मात्र, त्यांनी चीनशी झालेल्या कराराबाबत अधिक माहिती दिली नाही.  

June 17, 2025 1:44 PM June 17, 2025 1:44 PM

views 11

अमेरिकन नागरिकांनी तात्काळ इराणमधून बाहेर पडण्याचे निर्देश

इस्राईल आणि इराण यांच्यातला संघर्ष वाढत असून दोन्ही देश एकमेकांच्या पायाभूत सुविधा केंद्र आणि रहिवासी वस्त्यांवर हल्ले करत असल्याने संघर्षाची तीव्रता वाढत आहे. अमेरिकेच्या नागरिकांनी तात्काळ इराणमधून बाहेर पडावं असं त्यांनी सांगितलं आहे.  दरम्यान, इराणनं इस्राइलबरोबरचा संघर्ष थांबवावा आणि अणु कार्यक्रमाच्या मुद्दयावर चर्चा करावी असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. दोन्ही देशांच्या संघर्षात इस्राइलला कुठलीही प्रत्यक्ष मदत करणार नसल्याचं राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी स्पष्ट...

June 5, 2025 1:35 PM June 5, 2025 1:35 PM

views 11

अमेरिकेतल्या हार्वर्ड विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांच्या व्हिसावर निर्बंध घालणारी अधिसूचना जारी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हार्वर्ड विद्यापीठातील परदेशी विद्यार्थ्यांच्या व्हिसावर निर्बंध घालणारी अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेअंतर्गत व्हिसावरील तात्पुरत्या सहा महिन्यांचा निलंबनाची आणि आवश्यकता वाटल्यास निलंबनाचा कालावधी वाढवण्याची तरतूद आहे. या अधिसूचनेअंतर्गत ट्रम्प प्रशासानानं आपल्या परराष्ट्र विभागाला या अधिसूचनेतील निकषांच्या आधारे हार्वर्डच्या कोणत्याही विद्यमान विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि एक्सचेंज व्हिसा रद्द होऊ शकणार असतील तर ते रद्द करण्याचा विचार करावा अस...

March 6, 2025 10:05 AM March 6, 2025 10:05 AM

views 13

अमेरिकेचा हमासला कडक इशारा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला कडक इशारा दिला असून, गाझामध्ये बंदिवान असलेल्या सर्व ओलिसांची तत्काळ सुटका करण्याची आणि मृतदेह परत करण्याची मागणी केली आहे. व्हाईट हाऊसने दहशतवादी गटाशी थेट वाटाघाटी सुरू असल्याची पुष्टी केल्यानंतर काही तासांतच हा इशारा देण्यात आला. हा इशारा म्हणजे अमेरिकेच्या धोरणात बदल घडवून आणणारं एक पाऊल आहे. त्यांनी इस्रायलला हमासला संपवण्यासाठी आवश्यक असलेली सर्व मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. तसंच जर ओलिसांची सुटका केली नाही तर हमासचा एकही सदस्य सुरक्षि...

February 28, 2025 2:59 PM February 28, 2025 2:59 PM

views 22

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन, मेक्सिको, कॅनडावर लादले अतिरीक्त कर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनमधून होणाऱ्या आयातीवर १० टक्के अतिरिक्त कर लावण्याची घोषणा केली आहे. तसंच काल रात्री, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी येत्या मंगळवार पासून कॅनडा आणि मेक्सिकोवर २५ टक्के कर लावणार असल्याचं स्पष्ट केलं. या महिन्यात चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर याआधीच १० टक्के कर लावण्यात आला आहे.  अमेरिकेत फेंटानिल या औषधाचा प्रवाह रोखण्यासाठी पुरेशी कारवाई झालेली नसून चीनमध्ये तयार होणार हे औषध कॅनडा आणि मेक्सिकोमार्गे अमेरिकेत येतं असल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं. मे...