January 21, 2025 1:31 PM

views 14

अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारताच डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णयांचा धडाका

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचा पदभार स्वीकारताच डोनाल्ड ट्रम्प यांनी काही तासातच अनेक कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी केली. स्थलांतरितांच्या प्रवेशाला आळा घालणं, जीवाश्म इंधनाचं उत्पादन वाढवणं आणि २०२१ पॅरिस हवामान करारासह पर्यावरणीय नियम मागे घेणं हे निर्णय ट्रम्प यांनी पहिल्याच दिवशी घेतले. जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णयही त्यांनी घेतला आहे. कोविड महामारीची साथ निट न हाताळणं आणि त्यावर तातडीच्या उपाययोजना न करणं या कारणांमुळे हा निर्णय घेतल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं. जागतिक आरोग्...