September 3, 2024 3:05 PM September 3, 2024 3:05 PM

views 16

अमेरीकन ओपन टेनिस स्पर्धा : रोहन बोपण्णा आणि अल्डिला सुतजियादी यांचा मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश

अमेरीकन खुल्या टेनिस स्पर्धेत रोहन बोपण्णा आणि त्याची इंडोनेशियन जोडीदार अल्डिला सुतजियादी यांनी मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्यांनी उपांत्यपूर्व फेरीत मॅथ्यू एब्डेन आणि बार्बोरा क्रेजिकोव्हा या जोडीवर ७-६, २-६, १०-७ असा विजय मिळवला. उपांत्य फेरीत त्यांचा सामना डोनाल्ड यंग आणि टेलर टाऊनसेंड या अमेरिकन जोडीशी  होणार आहे.

August 29, 2024 1:30 PM August 29, 2024 1:30 PM

views 9

अमेरिकन खुल्या ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत नोव्हाक जोकोविचचा तिसऱ्या फेरीत प्रवेश

अमेरिकन खुल्या ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत नोव्हाक जोकोविचने तिसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. आर्थर ॲशे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात त्यानं त्याच्याच देशाचा म्हणजेच सर्बियाच्या लास्लो जेरेचाचा ६-४, ६-४, २-० ने पराभव केला. जोकोविचचा पुढील सामना ऑस्ट्रेलियाच्या ॲलेक्सी पोपिरनशी होणार असून जोकोविचनं गेल्या वर्षभरात पोपरिनला तीन विविध स्पर्धांमध्ये पराभूत केलं आहे.

August 27, 2024 12:18 PM August 27, 2024 12:18 PM

views 12

अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत भारताचा सुमित नागल पहिल्याच फेरीत बाहेर

 अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुषांच्या एकेरीत भारताचा महत्त्वाचा खेळाडू सुमित नागलला टेलॉन ग्रिकस्पोरनं पहिल्याच सामन्यात पराभूत केलं आहे. टेलॉननं त्याला १-६,३-६,६-७ असा पराभव केला. भारताच्या आशा आता रोहन बोपन्ना, युकी भांबरी आणि एन.श्रीराम बालाजी याच्यावर टिकून आहेत.