December 11, 2025 1:20 PM December 11, 2025 1:20 PM
23
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हनं केली प्रमुख व्याजदरात पाव टक्के कपात
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेनं आपल्या प्रमुख व्याजदरात पाव टक्के कपात केली असून, २०२२ साला नंतरचा हा नीचांकी स्तर आहे. व्याजदर पातळी ३ पूर्णांक ५ दशांश, ते ३ पूर्णांक ७५ शतांश टक्के, या टप्प्यात कायम राखण्याचं बँकेचं उद्दिष्ट आहे. फेडरल रिझर्व्हनं सप्टेंबर महिन्यापासून सलग तिसऱ्यांदा व्याज दर कपात केली असून, या वर्षभरात एकूण ७५ शतांश टक्के कपात झाली आहे. अमेरिकेतली वाढती महागाई आणि रोजगार निर्मितीमधली मंदी, या पार्श्वभूमीवर बँकेनं हा निर्णय घेतल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.