January 23, 2026 1:28 PM

views 31

जागतिक आरोग्य संघटनेतून अमेरिका औपचारिकरीत्या बाहेर

जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याची घोषणा अमेरिकने केली आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो आणि आरोग्यमंत्री रॉबर्ट केनेडी यांनी संयुक्त निवेदन जारी करुन हा निर्णय जाहीर केला. अकार्यक्षम नोकरशाही आणि कोविड १९ महामारीदरम्यानचं ढिसाळ व्यवस्थापन यामुळे संघटनेचा मूळ उद्देश मागे पडल्याची टीका निवेदनात केली आहे. अनेक अमेरिकन नागरिकांचे प्राण वाचले असते अशी महत्त्वाची माहिती ‘हू’ने वेळच्या वेळी दिली नाही असा आरोप अमेरिकेने केला आहे. या निर्णयाबरोबर अमेरिकेकडून ‘हू’ला मिळणारं अर्थसहाय्य पूर...

January 21, 2026 1:50 PM

views 27

ग्रीनलँड ताब्यात घेण्याच्या अमेरिकेच्या हालचालींना रशियाचा विरोध

ग्रीनलँड हा देश ताब्यात घेण्याच्या हालचाली अमेरिकेनं सुरू केल्यानंतर रशियानं त्याचा विरोध केला आहे.  ग्रीनलँड हा डेन्मार्कचा नैसर्गिक भाग नसून वसाहतवादाच्या हव्यासामुळे संयुक्त राष्ट्र संघाच्या सनदेच्या धोरणाचं उल्लंघन केल्याचं मत रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लॅव्हरोव्ह यांनी व्यक्त केलं आहे.  एका वार्ताहर परिषेत ते म्हणाले की, ग्रीनलँड ही डेन्मार्क ऐतिहासिक वसाहत असून तो २० शतकाच्या मध्यात डेन्मार्कशी संलंग्न झाला होता. दरम्यान, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्यान्यूयल मॅक्रोन यांनीही या प्रश्ना...

January 13, 2026 7:50 PM

views 13

अमेरिकेच्या कारवाईचा सामना करण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचं इराणचं प्रत्युत्तर

इराण अमेरिकेच्या कारवाईचा सामना करण्यासाठी पूर्णपणे तयार असल्याचं इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अरागाजी यांनी म्हटलं आहे. गेल्यावर्षी जून महिन्यात अमेरिकेने इराणवर केलेल्या लष्करी हल्ल्यापेक्षा यावेळी इराण अधिक सुसज्ज आहे, असं त्यांनी सांगितलं. आर्थिक अस्थैर्याच्या पार्श्वभूमीवर इराणमधे सध्या सरकारविरोधी निदर्शनं तीव्र झाली असून सरकार निदर्शकांवर बळाचा वापर करत आहे. यात आतापर्यंत दोन  हजार जण मृत्युमुखी पडल्याचं सांगितलं जात आहे. 

January 8, 2026 1:42 PM

views 29

जगभरातल्या ६० हून अधिक संस्थांच्या सदस्यत्वातून अमेरिकेची माघार

जगभरातल्या ६० हून अधिक संघटनांमधलं अमेरिकेचं सदस्यत्व अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रद्द केलं आहे. या संस्था कालबाह्य आणि अमेरिकेच्या हिताच्या विपरीत असल्याचा ट्रम्प यांचा दावा आहे. यातल्या ३१ संस्था संयुक्त राष्ट्रांच्या आणि ३५ इतर आहेत. यामध्ये Intergovernmental Panel on Climate Change, UN Department of Economic and Social Affairs, UN Population Fund, इंटरनॅशनल सोलर अलायन्सचा यांचा समावेश आहे. 

January 5, 2026 1:30 PM

views 29

अमेरिका व्हेनेझुएलावर तेल निर्यातबंदी लादणार; चीनकडून अमेरिकेचा निषेध

अमेरिका व्हेनेझुएलाच्या दैनंदिन कारभारात लक्ष देणार नसून राजकीय बदल घडवून आणण्यासाठी तेल निर्यातबंदी लागू करेल, असं अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी सांगितलं आहे. दोन दिवसांपूर्वी व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अमेरिकेने ताब्यात घेतल्यानंतर व्हेनेझुएलाचं सरकार अमेरिका चालवेल, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं होतं. त्या पार्श्वभूमीवर रुबियो यांनी हे विधान केलं आहे. व्हेनेझुएलाच्या उपराष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी देशाच्या हंगामी अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतली आ...

December 29, 2025 8:25 PM

views 16

रशियासोबतच युद्ध थांबवण्यासाठी युक्रेनला अमेरिककडून सुरक्षेची खात्री

रशियासोबतच युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकनं युक्रेनला १५ वर्षांसाठी सुरक्षेची खात्री द्यायची तयारी दाखवली आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी ही माहिती दिली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची काल फ्लोरिडामध्ये भेट घेतल्यावर ते बोलत होते. ही खात्री युक्रेनला देण्यासाठी अमेरिकन काँग्रेसची मंजुरी आवश्यक असेल. युक्रेननं ५० वर्षाच्या सुरक्षेची खात्री मागितली आहे. ट्रम्प आणि युरोपियन देशांचे नेते सुरक्षेच्या अटींना तयार झाले तर रशियासोबत चर्चा करू असं झेलेन्स्की म्हणाले. युद्ध था...

December 28, 2025 1:59 PM

views 44

युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार

रशिया आणि युक्रेनमधला वाढत तणाव, आणि या प्रदेशात शांतता राखण्यासाठी सुरु असलेल्या अमेरिकेच्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर, युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की आज फ्लोरिडामध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. या बैठकीत २० कलमी शांतता योजना आणि अमेरिकेच्या संभाव्य सुरक्षा हमीवर चर्चा होईल. युक्रेन मधल्या कीव शहरावर काल रशियानं केलेल्या हवाई हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला, तर शहराच्या अनेक भागातली वीज आणि हीटिंग सेवा खंडित झाली आहे. या पार्श्वभूमीवर ही भेट होत आहे.  &nbsp...

December 24, 2025 2:57 PM

views 40

अमेरिकेच्या H1-B व्हिजासाठीच्या निवड प्रक्रियेत बदल

अमेरिकेच्या एच वन बी व्हिजा साठीच्या निवड प्रक्रियेत अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने मोठे बदल केले आहेत.  त्यानुसार यापुढे एच वन बी व्हिजा साठी लॉटरी व्यवस्था बंद करून त्याऐवजी अधिक उच्चशिक्षित आणि जास्त पगार मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे. यामुळे अमेरिकन कर्मचाऱ्यांना अधिक चांगलं वेतन आणि रोजगाराच्या संधी मिळू शकतील, असं अमेरिकेच्या अंतर्गत सुरक्षा विभागाने म्हटलं आहे.    आजवर या व्हिजा साठीच्या लॉटरी व्यवस्थेचा गैरवापर अमेरिकन कंपन्यांनी फक्त कमी पगारावर येणाऱ्या कर्मचाऱ्य...

December 20, 2025 1:17 PM

views 15

औषधांच्या दरात कपात करण्याच्या उद्देशाने अमेरिकेचा ९ औषध उत्पादक कंपन्यांबरोबर करार

ठराविक औषधांच्या दरात कपात करण्याच्या उद्देशाने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नऊ औषध उत्पादक कंपन्यांबरोबर नवीन करार केले आहेत. या करारानुसार या कंपन्यांकडून उत्पादित केल्या जाणाऱ्या  नवीन औषधांची  सर्वाधिक पसंतीच्या देशांच्या किंमतीप्रमाणे दरनिश्चिती केली जाईल. विशेषतः वैद्यकीय विमाधारक नसलेल्या रुग्णांना लाभ मिळावेत यासाठी हा उपक्रम राबवला जाणार आहे. 

December 19, 2025 1:25 PM

views 15

राष्ट्रीय संरक्षण अधिकरण कायद्यावर अमेरिकेची स्वाक्षरी

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आर्थिक वर्ष २०२६ साठीच्या राष्ट्रीय संरक्षण प्रमाणीकरण कायद्यावर स्वाक्षरी केली आहे. मुक्त आणि शांततापूर्ण हिंद प्रशांत क्षेत्रासाठी भारत आणि क्वाड देशांबरोबर संबंध सुधारण्यासाठी  आणि चीनने उभ्या केलेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी या कायद्याचं महत्व आहे. अमेरिकन सरकारच्या युद्ध विभागाचा ‘सामर्थ्याच्या माध्यमातून शांतता’ हा कार्यक्रम राबवून अमेरिकेची अंतर्गत सुरक्षा व्यवस्था आणि संरक्षण उद्योग बळकट करण्यासाठी हा कायदा उपयोगी ठरेल असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे...