February 27, 2025 9:13 AM February 27, 2025 9:13 AM

views 9

युरोपिय आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डर लेयन भारत दौऱ्यावर

युरोपिय आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डर लेयन आजपासून दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. लेयन यांचा हा तिसरा भारत दौरा असून त्या आज संध्याकाळी परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांची भेट घेतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या युरोपियन आयोगाच्या अध्यक्षांसोबत शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा करतील. भारत आणि युरोप 2004 पासून धोरणात्मक भागीदार आहेत आणि त्यांचे द्विपक्षीय संबंध विविध क्षेत्रात विस्तारले आणि दृढ झाले आहेत. या दौऱ्यामुळे द्विपक्षीय संबंध अधिक भक्कम होण्याचा मार्ग मोकळा होईल.

July 19, 2024 2:52 PM July 19, 2024 2:52 PM

views 6

युरोपियन संसदेने जर्मनीच्या उर्सुला वोन डेर लेयेन यांची युरोपियन आयोगाच्या अध्यक्षपदी पुन्हा निवड

युरोपियन संसदेनं जर्मनीच्या उर्सुला वोन डेर लेयेन यांची पुढच्या पाच वर्षांसाठी युरोपियन आयोगाच्या अध्यक्षपदी पुन्हा निवड केली. उर्सुला वोन डेर लेयेन यांना युरोपियन संघाच्या ७२० सदस्यांपैकी ४०१ सदस्यांची मतं मिळाली. निवड झाल्याननंतर उर्सुला यांनी आगामी पाच वर्षातल्या योजनांची माहिती युरोपियन संसदेत दिली.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशाद्वारे उर्सुला यांची युरोपियन आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं आहे.