June 13, 2024 8:33 PM June 13, 2024 8:33 PM

views 8

यूपीएससी परीक्षा १६ जूनला होणार

केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीची नागरी सेवा पूर्व परीक्षा - २०२४ येत्या १६ जूनला होणार आहे. मुंबई शहर जिल्ह्यात एकूण ३६ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेण्यात येणार असून यासाठी एकूण १४ हजार ५०९ परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत.   दोन सत्रांत होणाऱ्या या परीक्षेसाठी परीक्षार्थींनी परीक्षा केंद्रावर  किमान अर्धा तास  अगोदर उपस्थित राहणं  अनिवार्य आहे, असं  मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव यांनी सांगितलं.