January 10, 2026 8:48 PM

views 24

UPSC च्या सर्व परीक्षांपूर्वी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्याची पडताळणी होणार

UPSC अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या   निवड परीक्षेला बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी प्रत्यक्ष चेहरा पडताळणीला सामोरं जावं लागणार आहे. २०२५ दरम्यान झालेल्या एन डी ए च्या,  नेव्हल अकॅडेमि च्या आणि सी डी एस च्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचीही आयोगानं चेहरा पडताळणी केली होती. या पडताळणी दरम्यान विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्जासोबत जोडलेलं त्यांचं छायाचित्र आणि त्यांच्या प्रत्यक्ष चेहऱ्याची यांत्रिक पद्धतीनं शहानिशा केली जाते.

April 22, 2025 3:23 PM

views 23

UPSC परीक्षाच्या निकालात शक्ती दुबे देशात पहिल्या क्रमांकावर

UPSC च्या २०२४ च्या नागरी सेवा परीक्षाच्या निकालात शक्ती दुबे देशात पहिल्या क्रमांकावर आहे. हर्षित गोयल दुसऱ्या आणि अर्चित डोंगरे तिसऱ्या स्थानी आहे.  यावेळी एकूण १००९ उमेदवारांची विविध नागरी सेवांसाठी निवड झाली आह. त्यात १८० IAS साठी, ५५ IFS साठी आणि १४७ उमेदवार IPS साठी निवडले गेले आहेत.

February 9, 2025 7:24 PM

views 14

नागरी सेवा प्राथमिक परीक्षेसाठी अर्ज भरण्याची मुदतवाढ १८ फेब्रुवारीपर्यंत

केंद्रीय लोकसेवा आयोगानं नागरी सेवा प्राथमिक परीक्षा २०२५ साठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत येत्या १८ फेब्रुवारीपर्यंत वाढवली आहे. याशिवाय, अर्जात काही बदल असल्यास त्यात दुरुस्ती करण्याची मुदत १९ ते २५ फेब्रुवारी  पर्यंत असणार आहे.   यापूर्वी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ फेब्रुवारी होती. केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे दरवर्षी नागरी सेवा परीक्षा,  प्राथमिक, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या तीन टप्प्यांत घेतली जाते.

December 10, 2024 1:02 PM

views 17

यूपीएससीच्या नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२४चा निकाल जाहीर

यूपीएससी अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२४ चा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत  निवड  झालेले उमेदवार आता भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय परदेश सेवा, भारतीय पोलीस सेवा आणि इतर सेवांमध्ये निवड होण्यासाठी व्यक्तिमत्त्व चाचणी मुलाखतीला सामोरे जातील. या मुलाखतीच्या तारखा नंतर जाहीर करण्यात येतील. हा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

September 26, 2024 3:20 PM

views 22

पूजा खेडकर यांना दिलासा कायम, सुनावणी पुढे ढकलली

बडतर्फ प्रशिक्षणार्थी आयएसएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या हंगामी जामीन अर्जावरची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. अटकपूर्व अंतरिम संरक्षण वाढवण्याचा निर्णय उच्च न्यायालयानं दिला आहे. खेडकरांच्‍या वकिलांनी तपशीलवार म्हणणं मांडण्यासाठी वेळ मागितला आहे.  आता या प्रकरणाची सुनावणी ४ ऑक्टोबर रोजी होणार असून, तोपर्यंत पूजा खेडकरला दिलेला दिलासा कायम असेल. खेडकर यांच्यावर चुकीच्या पद्धतीने ओबीसी आणि दिव्यांग कोट्यातून सवलत घेतल्याचा आरोप आहे. सध्या त्या हंगामी जामिनावर आहेत. पूजा खेडकर यांच्या जामीन अर्जाला...

August 29, 2024 1:37 PM

views 24

युपीएससीला उमेदवारांची ओळख पडताळण्यासाठी आधार आधारित प्रमाणीकरण करण्याची परवानगी

केंद्रीय लोकसेवा आयोग - युपीएससीला उमेदवारांची ओळख पडताळण्यासाठी आधार आधारित प्रमाणीकरण करण्याची परवानगी केंद्रसरकारने दिली आहे. परीक्षेसाठी नोंदणी करताना तसंच परिक्षेच्या विविध टप्प्यावर आयोगाला हे प्रमाणीकरण करता येईल. बडतर्फ प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकर यांनी खोटी माहिती दाखवून अनेक वेळा युपीएससीची परीक्षा दिल्याच्या प्रकरणानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

August 20, 2024 6:52 PM

views 8

केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून ४५ पदांसाठीच्या समांतर भरतीची जाहिरात रद्द

केंद्रीय लोकसेवा आयोगाने जाहीर केलेली ४५ पदांवरची समांतर भरतीची जाहिरात रद्द केली आहे. ही पदभरती रद्द करावी अशी विनंती केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष प्रीती सुदन यांना केली होती. २०१४पूर्वी अनेक पदांवर अशाच प्रकारे भरती करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर पक्षपात झाल्याचे आरोप झाले होते. पद भरतीची प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने आणि राज्यघटनेने नमूद केलेल्या समानता आणि सामाजिक न्यायाच्या तत्वांशी सुसंगत असणं आवश्यक आहे. उपेक्षित समाजातल्या पात्र उमेदवारांना सरकारी से...

July 31, 2024 7:13 PM

views 13

वादग्रस्त परिविक्षाधीन सनदी अधिकारी पूजा खेडकर यांची नियुक्ती केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून रद्द

भारतीय प्रशासकीय सेवेतल्या वादग्रस्त परिविक्षाधीन अधिकारी पूजा खेडकर यांची नियुक्ती केंद्रीय लोकसेवा आयोगाने रद्द केली आहे. तसंच पुन्हा कोणतीही प्रशासकीय सेवा परीक्षा देण्यावर कायमची बंदी घातली आहे. परिविक्षाधीन कालावधीत अवाजवी मागण्या केल्याचा, तसंच दिव्यांगत्वाचं खोटं प्रमाणपत्र सादर करुन आरक्षणाचा लाभ उकळल्याचा, तसंच नागरी प्रशासकीय सेवा परीक्षेच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप खेडकर यांच्यावर आहे. या संदर्भात आयोगाने बजावलेल्या नोटिशीला उत्तर देण्यासाठी खेडकर यांना आज दुपारी साडेतीन पर्यंत...

July 20, 2024 1:47 PM

views 46

केंद्रिय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष मनोज सोनी यांचा राजीनामा

UPSC अर्थात केंद्रिय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष मनोज सोनी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आपला राजीनामा त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सुपूर्द केला आहे. त्यांचा कार्यकाळ २०२९ मध्ये संपणार होता, पण आपल्या वैयक्तिक कारणांसाठी त्यांनी राजीनामा देत असल्याचं सांगितलं. सोनी २०१७ पासून केंद्रिय लोकसेवा आयोगाचे सदस्य म्हणून काम पाहत होते. १६ मे २०२३ रोजी त्यांनी आयोगाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला होता. केंद्रिय लोकसेवा आयोगाचे सदस्य होण्याआधी सोनी यांनी दोन विद्यापीठांचे कुलगुरू म्ह...

July 20, 2024 9:45 AM

views 16

वादग्रस्त प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर विरोधात यूपीएससीकडून गुन्हा दाखल

 केंद्रीय लोकसेवा आयोग-यूपीएससीने नागरी सेवा परीक्षा २०२२ तुकडीच्या प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आयोगाने कलेल्या सखोल तपासणीत, पूजा खेडकर यांनी अनेकदा त्यांच्या नावात, स्वाक्षरी आणि ईमेल तसच मोबाईल क्रमांकात बदल करून आयोगाची फसवणूक केल्याचं निष्पन्न झालं आहे. या गैरवर्तनाबद्दल त्यांची उमेदवारी रद्द का करु नये, अशी कारणे दाखवा नोटीसही आयोगानं खेडकर यांना बजावली आहे.