March 20, 2025 10:22 AM March 20, 2025 10:22 AM
9
BHIM-UPI द्वारे छोट्या व्यवहारांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारची प्रोत्साहन योजना
भीम-यूपीआयद्वारे छोट्या व्यवहारांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारने प्रोत्साहन योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही माहिती दिली. या योजनेअंतर्गत कमी रकमेच्या प्रत्येक व्यवहारावर शून्य पूर्णांक १५ शतांश टक्के प्रोत्साहन देण्यात येईल. दोन हजार रुपयांपर्यंतच्या व्यवहारांसाठी हा नियम लागू असेल. या निर्णयामुळे छोटे व्यापारी कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय यूपीआय सेवांचा लाभ घेऊ शकतील, असं वैष्णव यांनी सांगितलं.