October 12, 2025 10:09 AM October 12, 2025 10:09 AM

views 29

शाळा प्रवेश आणि परीक्षा शुल्क भरण्यासाठी युपीआयचा वापर करण्याचं शिक्षण मंत्रालयाचं शाळांना आवाहन

शाळा प्रवेश आणि परीक्षा शुल्क भरण्यासाठी युपीआयचा वापर करण्याचं शिक्षण मंत्रालयाचं शाळांना आवाहन शाळा प्रवेश आणि परीक्षा शुल्क गोळा करण्यासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील शाळांनी युपीआयचा वापर करण्याचं आवाहन शिक्षण मंत्रालयानं शाळांना केलं आहे. राज्य, केंद्रशासित प्रदेश तसंच एनसीइआरटी, सीबीएससी, केंद्रीय विद्यालय संघटना, राष्ट्रीय विद्यालय संघटनांसारख्या स्वायत्त संस्थांना पत्राद्वारे हे आवाहन करण्यात आलं आहे. शाळांमधील कायदेविषयक, धोरणात्मक आणि संस्थात्मक सुधारणांच्या माध्यमातून जीवन आणि श...

October 7, 2025 8:07 PM October 7, 2025 8:07 PM

views 32

संयुक्त खाते धारकांनाही आता मिळणार UPI सुविधा

बँकेत संयुक्त खातं असणाऱ्यांनाही आता युपीआयचा लाभ घेता येईल. रिझर्व्ह बँकेचे डेप्यूटी गव्हर्नर टी. रविशंकर यांनी आज ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये या सुविधेचा प्रारंभ केला. कुठल्याही युपीआय अॅपद्वारे या सुविधेचा लाभ घेता येईल. स्मार्ट ग्लास अर्थात अत्याधुनिक चष्म्यांच्या माध्यमातून आता छोट्या रकमेचे व्यवहार युपीआय द्वारे करता येतील. याची सुरुवातही त्यांनी आज केली. 

September 12, 2025 9:04 PM September 12, 2025 9:04 PM

views 12

युपीआयच्या माध्यमातून सोमवारपासून दिवसाला १० लाखापर्यंतचे व्यवहार करता येणार

एन पी सी आय नं व्यक्ती ते व्यापारी या प्रकारातल्या युपीआय व्यवहारांची मर्यादा दहा लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. येत्या १५ तारखेपासून हा बदल लागू होईल. मोठ्या रकमेच्या व्यवहारांवर मर्यादा असल्यामुळे ग्राहकांना व्यवहार विभाजित करून, किंवा धनादेश, बँक ट्रान्सफर यांसारख्या पारंपरिक पद्धती वापराव्या लागत होत्या, अशा क्षेत्रांना या निर्णयामुळे लाभ होणार आहे. मात्र, व्यक्ती ते व्यक्ती व्यवहारांची मर्यादा १ लाख रुपये प्रति दिवस अशी पूर्वीप्रमाणेच कायम राहणार आहे. इतर क्षेत्रातही युपीआय व्यवहाराची मर्यादा...

August 5, 2025 2:36 PM August 5, 2025 2:36 PM

views 12

UPI व्यवहारांनी प्रथमच ७० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला

युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस अर्थात UPI वरून केल्या जाणाऱ्या दैनंदिन व्यवहारांनी पहिल्यांदाच ७० कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया -NPCI नं प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालानुसार, २ ऑगस्ट रोजी UPI व्यवहारांची संख्या सुमारे ७० कोटी ७० लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे.   गेल्या दोन वर्षांत UPI व्यवहारांची दैनंदिन संख्या दुपटीनं वाढली असली, तरी एकूण व्यवहारांच्या रकमेच्या वाढीचा वेग गेल्यावर्षांच्या तुलनेत मंदावला आहे. केंद्र सरकारनं UPI च्या माध्यमातून दररोज १०० कोटी...

August 2, 2025 8:29 PM August 2, 2025 8:29 PM

views 9

युपीआयचा गेल्या महिन्यात १ हजार ९४७ कोटी व्यवहारांसह नवीन विक्रम

देशाच्या डिजिटल पेमेंटचा आधार असलेल्या युपीआय, म्हणजेच  युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसनं  जुलै २०२५ मध्ये १ हजार ९४७ कोटी व्यवहारांसह एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. या व्यवहारांची एकूण रक्कम तब्बल २५ लाख १० हजार कोटी रुपये इतकी आहे. ही  आकडेवारी युपीआय द्वारे केलेल्या व्यवहारांमध्ये वर्षाला ३५ टक्के, तर व्यवहार मूल्यात २२ टक्के वाढ दर्शवत असून, डिजिटल पेमेंट परिसंस्थेतलं  युपीआय चं  वर्चस्व अधोरेखित करत आहे.

June 13, 2025 11:56 AM June 13, 2025 11:56 AM

views 14

यूपीआयद्वारे केल्या जाणाऱ्या व्यवहारांसाठी विक्रेत्यांना सवलत देण्यात येणार असल्याचे दावे पूर्णपणे खोटे, अर्थ मंत्रालयाकडून स्पष्ट

यूपीआयद्वारे केल्या जाणाऱ्या व्यवहारांसाठी विक्रेत्यांना सवलत देण्यात येणार असल्याचे दावे पूर्णपणे खोटे असल्याचं केंद्रीय अर्थ मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. यूपीआय द्वारे केल्या जाणाऱ्या व्यवहारांना सरकार कायम प्रोत्साहन देत राहील, असंही मंत्रालयानं म्हटलं आहे.  

June 12, 2025 2:43 PM June 12, 2025 2:43 PM

views 16

सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या तत्त्वांनुसार भारतानं अनुभवलं उल्लेखनीय परिवर्तन

सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या तत्त्वांनुसार वाटचाल करत भारतानं गेल्या दशकात उल्लेखनीय परिवर्तन अनुभवलं आहे. गेल्या दशकात सरकारनं समावेशक विकास आणि जीवन सुलभीकरणसाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी शक्ती म्हणून वापर केला. डिजिटल पेमेन्टचा सर्वांकडून केला जाणार वापर म्हणजे यशाचा महत्त्वाचा टप्पा आहे. केवळ एप्रिल २०२५ या महिन्यात सुमारे २५ लाख कोटी रुपयांचे १ हजार ८६७ कोटीहून अधिक युपीआय व्यव्हारची नोंद झाली. संयुक्त अरब अमिरात, सिंगापूर, भूतान, नेपाळ ,श्रीलंका, फ्रांस आणि मॉरिशिस या देशांमध्येही  युपीआय प...

June 11, 2025 8:35 PM June 11, 2025 8:35 PM

views 17

फसवणूक टाळण्यासाठी सेबी UPI ID सुरू करणार

गुंतवणूकदारांना फसवून त्यांना अनधिकृत बँक खात्यात पैसे जमा करायला लावण्याचे प्रकार टाळण्यासाठी सेबीनं नवीन प्रणाली विकसित केली आहे. यानुसार अधिकृत बँक खात्याची ओळख दर्शवणारे UPI ID सुरू केले जाणार आहेत. शेअर दलालांच्या अधिकृत युपीआय आयडीमध्ये brk तर म्युच्युअल फंडांच्या अधिकृत युपीआय आयडीमध्ये mf असा उल्लेख असेल. याशिवाय वैध युपीआय आयडी दर्शवताना हिरव्या त्रिकोणात अंगठ्याचं चिन्ह दिसेल. यावरुन हा युपीआय आयडी अधिकृत आहे, हे ग्राहकांना लक्षात येईल. ऑक्टोबरपासून ही सुविधा सुरू होणार आहे.

May 6, 2025 3:36 PM May 6, 2025 3:36 PM

views 14

UPI क्यूआर कोडने नोंदवली ९१.५० टक्क्यांची वाढ

यूपीआय क्यूआर कोडने २०२४-२५ या आर्थिक वर्षात डिजिटल पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये ९१.५० टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. यूपीआय क्यूआर कोडमध्ये वाढ झाल्यानं क्रेडिट कार्ड व्यवहारांचा विकासदर ७ पूर्णांक ९४ शतांश टक्क्यांवर आला आहे. मार्चमध्ये यूपीआय व्यवहारांमध्ये २४ लाख ७७ हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये देशात पाचपैकी चार व्यवहार यूपीआय वापरुन करण्यात आले आहेत.

April 12, 2025 3:31 PM April 12, 2025 3:31 PM

views 23

तांत्रिक बिघाडामुळे देशभरात युपीआय सेवा विस्कळीत

तांत्रिक बिघाडामुळे देशभरात आज युपीआयच्या सेवा विस्कळीत झाल्यानं कोट्यावधी ग्राहकांची गैरसोय होत आहे.   यामुळं अनेक बँकांच्या ॲपच्या कामावर परिणाम झाला आहे. ही तांत्रिक अडचण दूर करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं कळवलं आहे.    दररोज सरासरी ५९ कोटी व्यवहार युपीआय द्वारे होतात आणि त्यातून ८० हजार कोटी रुपयांची देवाणघेवाण होते.