July 19, 2025 3:26 PM July 19, 2025 3:26 PM
10
उत्तर प्रदेशात दोन निरनिराळ्या अपघातांमध्ये ६ जणांचा मृत्यू
उत्तर प्रदेशात यमुना एक्स्प्रेस वे इथं आज झालेल्या दोन निरनिराळ्या अपघातांमध्ये किमान ६ जणांचा मृत्यू झाला असून इतर १९ जण जखमी झाले आहेत. यातला पहिला अपघात पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास झाला. यात एक मिनी व्हॅन ट्रकला धडकून झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला तर दोघेजण गंभीर जखमी झाले. यानंतर, तासाभरातच दिल्लीहून मथुरेला जाणारी बस उलटून यातून प्रवास करत असलेले सर्व १७ प्रवासी जखमी झाले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.