April 2, 2025 7:58 PM April 2, 2025 7:58 PM

views 9

राज्यात अवकाळी पावसाचा इशारा

राज्याच्या जवळपास सर्वच भागात आज आणि उद्या अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचीही शक्यता आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहिल्यानगर, बीड, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यात आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. भंडारा, गोंदिया, छत्रपती संभाजीनगर, जालना, धुळे आणि नंदूरबार वगळता राज्यातल्या इतर सर्व जिल्ह्यात आज हवामान विभागानं यलो अलर्ट दिला आहे.

April 1, 2025 7:46 PM April 1, 2025 7:46 PM

views 53

अवकाळी पावसामुळे पीकांचं नुकसान

सातारा जिल्ह्यातल्या कराड तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट सुरू असून उर्वरित भागात सोसाट्याचा वारा सुरू आहे.   जालना जिल्ह्यात आज काही ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली. घनसावंगी तालुक्यातल्या अनेक गावांमधे जोरदार पाऊस झाला. यामुळे मका, गहू आणि हरभऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे.    पालघर जिल्ह्यात कालपासून ढगाळ वातावरण होतं. जिल्ह्यातल्या काही भागात हलका पाऊस पडला.

March 26, 2025 9:23 AM March 26, 2025 9:23 AM

views 12

राज्यात ‘अवकाळी’ पाऊस !

राज्यात अनेक भागांमध्ये अवकाळी पावसान हजेरी लावली. रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसानं जोरदार पाऊस झाल. रत्नागिरी शहर परिसरातही किरकोळ पावसाच्या सरी बरसल्या. कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला तर पेठ वडगाव परिसरात दोन तास गारांचा पाऊस झाला. सांगली जिल्ह्यात मिरज आणि परिसरात वादळी वारा आणि मेघगर्जनेसह जोरदार पावसाची नोंद झाली. सातारा जिल्ह्यात सातारा आणि जावळी तालुक्यातल्या काही गावांतही काल पावसानं हजेरी लावली.

March 23, 2025 9:48 AM March 23, 2025 9:48 AM

views 15

गडचिरोलीत अवकाळी पावसामुळे पीकांचं नुकसान

गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात शुक्रवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे मिरची आणि कापूस पिकांना मोठा फटका बसला आहे. शासनानं तत्काळ पंचनामे करुन भरपाई द्यावी, अशी मागणी मिरची आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. जिल्ह्याच्या अहेरी आणि चामोर्शी तालुक्यातील काही भागातही शेतकऱ्यांना पावसाचा फटका बसला असून, यंदा मोहफुलांच्या उत्पादनावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.

March 14, 2025 2:08 PM March 14, 2025 2:08 PM

views 14

देशाच्या काही भागात अवकाळी पावसाची हजेरी

पश्चिमी वाऱ्यांच्या प्रभावामुळे देशाच्या काही भागात पावसाने हजेरी लावली आहे.  राजस्थानात अनेक ठिकाणी काल संध्याकाळपासून जोरदार पाऊस होत आहे. राज्याच्या बहुतांश भागात पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांची शक्यता हवामानविभागाने वर्तवली आहे. हिमाचल प्रदेशात हिमवृष्टी आणि पावसामुळे तापमापकातला पारा शून्याखाली घसरला आहे.   लाहौल-स्पीति आणि कुल्लू मधले सुमारे 130 रस्त्यांवरची वाहतूक ठप्प झाली आहे. अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे. जम्मू काश्मीर, लडाख आणि अरुणाचल प्रदेशात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस ...