May 13, 2025 7:37 PM May 13, 2025 7:37 PM
3
राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी
राज्याच्या विविध भागात आज वळवाच्या पावसाने हजेरी लावली. मुंबईच्या पूर्व उपनगरात आज सकाळी नऊ वाजल्यापासून अवकाळी पावसाच्या जोरदार सरी पडल्या. भारतीय हवामान विभागानं मुंबई शहरात आज आणि उद्यासाठी यलो अलर्ट जारी केला असून, शहरात वादळी वारे, गडगडाट, आणि हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे. नाशिक शहर आणि परिसरात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस झाला. आज दुपारनंतर ढगाळ वातावरण झालं आणि पावसाला सुरूवात झाली. अल्पावधीतच मुसळधार पाऊस झाल्याने शहरातले अनेक रस्ते बंद झाले असून मोठी झाडं उन्...