March 25, 2025 3:27 PM March 25, 2025 3:27 PM

views 5

United Nations Security Council: जम्मू-काश्मीर कायमच भारताचा अविभाज्य भाग

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत बोलताना भारताचे संयुक्त राष्ट्रांमधले राजदूत पार्वतानेनी हरीश यांनी पाकिस्तानने काश्मीरचा वारंवार उल्लेख केल्याबद्दल टीका केली. जम्मू आणि काश्मीर हा कायमच भारताचा अविभाज्य भाग राहिला आहे असं सांगत त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या शांतता सुधारणांवरच्या चर्चेत पाकिस्तानचा निषेध केला. जम्मू आणि काश्मीरचा एक भाग पाकिस्तानने बेकायदेशीरित्या ताब्यात घेतला असून त्याने तो त्वरित मोकळा करावा, काश्मीरच्या उल्लेखाआड बेकायदेशीर घुसखोरी आणि दहशतवादाचं समर्थन करता येणार नाही...

October 26, 2024 6:50 PM October 26, 2024 6:50 PM

views 6

UNSC चर्चासत्रात काश्मिरबाबत चुकीची भूमिका मांडल्यानं भारताची पाकिस्तानवर टीका

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या चर्चासत्रात काश्मिरबाबत चुकीची भूमिका मांडल्यानं भारतानं पाकिस्तानवर कठोर टीका केली आहे. पाकिस्तानचं हे कृत्य चुकीच्या माहितीचा प्रसार करण्याच्या नेहमीच्या सवयीनुसार निंदनीय आणि खोडसाळ असल्याचं भारताचे सुरक्षा परिषदेतले कायम प्रतिनिधी पी हरीश यांनी म्हटलं आहे. एखाद्या महत्वाच्या वार्षिक चर्चासत्रात असत्य राजकीय भूमिका मांडून सर्वांची दिशाभूल करणं सर्वस्वी चुकीचं असल्याची टीका हरीश यांनी केली आहे.

September 10, 2024 1:26 PM September 10, 2024 1:26 PM

views 10

संयुक्त राष्ट्रांचं स्थायी सदस्यत्व आफ्रिकेच्या सहभागासह अधिक प्रातिनिधिक बनवण्याचं भारताचं आवाहन

भारतानं संयुक्त राष्ट्रांचं स्थायी सदस्यत्व आफ्रिकेच्या सहभागासह अधिक प्रातिनिधिक बनवण्याचं आवाहन केलं असून, सुरक्षा परिषदेतल्या राजकीय मतभेदांमुळे शांतता कार्यात बाधा येत असल्याचं अधोरेखित केलं आहे. संयुक्त राष्ट्रात भारताचे नवनियुक्त स्थायी प्रतिनिधी पी हरीश यांनी काल सुरक्षा परिषदेला पहिल्यांदाच संबोधित केलं. त्यावेळी ते बोलत होते. सुरक्षा परिषदेला, विशेषतः कायम स्वरूपी सदस्यांनी  आजच्या वास्तवाचं  अधिक प्रतिनिधीत्व करायला हवं असं  ते यावेळी म्हणाले. शांतता कार्यात भारताचं सर्वात मोठं योगदान ...