January 5, 2026 3:42 PM January 5, 2026 3:42 PM

views 19

युनिव्हर्सल म्युझिक ग्रुप आणि एक्सेल एंटरटेनमेंट यांच्यामध्ये धोरणात्मक भागीदारी कराराची घोषणा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या वर्षी पार पडलेल्या वेव्ज परिषदेत संगीत आणि कला क्षेत्रातल्या अनेक नवीन आंतरराष्ट्रीय प्रकल्पांची बीजे रोवली गेली होती, त्याचा परिणाम म्हणून आज संगीत क्षेत्रातला जागतिक पातळीवरचा पहिला करार मुंबईत होत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. युनिव्हर्सल म्युझिक ग्रुप आणि एक्सेल एंटरटेनमेंट यांच्यामध्ये आज मुंबईत धोरणात्मक भागीदारी कराराची घोषणा करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.   नव्या पिढीच्या प्रेक्षकांना आकर्षित करणाऱ...