January 4, 2025 10:10 AM January 4, 2025 10:10 AM

views 7

अमेरिकेत माइक जॉन्सन यांची काठावरच्या मतांनी सभापतिपदी फेरनिवड

अमेरिकेत डोनाल्ड ट्रंप यांचा पाठिंबा असलेले माइक जॉन्सन यांची संसदेत सभापती म्हणून फेरनिवड झाली आहे. तीन रिपब्लिकन सदस्यांनी त्यांच्याविरुद्ध मतदान केलं होतं, मात्र ऐन वेळी त्यांनी त्यांचं मत बदलल्यामुळे जॉन्सन यांची निवड होऊ शकली. जॉन्सन यांना 218, तर डेमोक्रॅट पक्षाचे हकीम जेफ्रीस यांना 215 मतं मिळाली आहेत. जॉन्सन यांना काठावरची मतं मिळाल्यामुळे सभागृह चालवणं त्यांच्यासाठी आव्हानाचं असणार आहे.

July 16, 2024 12:48 PM July 16, 2024 12:48 PM

views 12

अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी रिपब्लिकन पक्षाकडून माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अधिकृत उमेदवार

अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना रिपब्लिकन पक्षानं अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केलं आहे. मिलवॉकी इथं झालेल्या रिपब्लिकन राष्ट्रीय समिती सदस्यांच्या बैठकीत ट्रम्प यांना बहुमत मिळाल्यानंतर त्यांची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे ट्रम्प सलग तिसऱ्या वेळा रिपब्लिकन पक्षाचे अधिकृत उमेदवार असणार आहेत. नोव्हेंबर महिन्यात ही निवडणूक होणार आहे.   ओहायोचे सेनेटर जे. डी. व्हान्स आपले उपाध्यक्षपदासाठीचे उमेदवार असतील, असं ट्रम्प यांनी जाहीर केलं आहे. व्हान्स यांची...