April 26, 2025 12:49 PM April 26, 2025 12:49 PM

views 9

दहशतवादाचा मुकाबला करण्याची गरज- संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं जम्मू काश्मीरमधल्या पहलगाम हल्ल्याचा तीव्र  शब्दांत निषेध केला आहे. जागतिक शांततेसाठी दहशतवाद हा मोठा धोका असून सगळ्या प्रकारच्या दहशतवादाचा मुकाबला करण्याची गरज आहे, असं परिषदेच्या सदस्यांनी म्हटलं आहे.   पहलगाम हल्ल्याचे गुन्हेगार, समर्थक आणि प्रायोजक यांना शिक्षा देण्याचं आवाहन त्यांनी केलं. या प्रकरणी सर्व देशांनी आंतरराष्ट्रीय कायद्यांतर्गत सहकार्य करावं, असं आवाहनही त्यांनी केलं. आपली संघटना परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून असल्याचं संयुक्त राष्ट्रांचे प्र...

January 3, 2025 1:47 PM January 3, 2025 1:47 PM

views 12

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्य म्हणून डेन्मार्क, ग्रीस , पाकिस्तान, पनामा आणि सोमालिया या देशांचा दोन वर्षांचा कार्यकाळ सुरु

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्य म्हणून डेन्मार्क, ग्रीस , पाकिस्तान, पनामा आणि सोमालिया या देशांचा दोन वर्षांचा कार्यकाळ कालपासून सुरु झाला. या पाच देशांच्या जबाबदारीचं प्रतीक म्हणून त्यांचे ध्वज रोवण्याचा कार्यक्रम काल सुरक्षा परिषदेच्या न्यूयॉर्क इथल्या मुख्यालयात झाला. इक्वाडोर, जपान, माल्टा, मोझाम्बिक आणि स्वित्झरलँड यांची जागा या देशांनी घेतली आहे.