September 21, 2025 8:06 PM September 21, 2025 8:06 PM

views 26

यूके, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाकडून पॅलेस्टाईनला देश म्हणून अधिकृत मान्यता

यूनायटेड किंगडम, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या देशांनी पॅलेस्टाईनला देश म्हणून अधिकृत मान्यता दिली आहे. ब्रिटनचे प्रधानमंत्री केयर स्टारमर यांनी एका व्हिडिओ निवेदनात ही घोषणा केली. शांतता आणि समाधानाच्या दिशेनं हे महत्वाचं पाऊल असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नि यांनी देशाच्या शांततेसाठी या मान्यतेला दुजोरा दिला. ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांनी देखील संयुक्त निवेदनाद्वारे पॅलेस्टाईनला स्वतंत्र आणि सार्वभौम राज्य म्हणून मान्यता दिली.

April 12, 2025 2:46 PM April 12, 2025 2:46 PM

views 15

नायटेड किंग्डम मध्ये आजपासून युरोपमधल्या देशांमधून मांस आणि दुग्धजन्य पदार्थांच्या आयातीवर बंदी

युरोपमधल्या प्राण्यांमध्ये फूट अँड माऊथ आजार वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर युनायटेड किंग्डमनं आजपासून युरोपमधल्या देशांमधून मांस आणि दुग्धजन्य पदार्थांच्या आयातीवर बंदी घातली आहे. युकेमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रवाशांना आपल्यासोबच वैयक्तिक वापरासाठी मेंढी, बकरी, गाय, डुकराचे मांस आणि दुग्धजन्य पदार्थ आणता येणार नाहीत. याशिवाय सँडविच, चीझ, कच्चं मांस, आणि दूध आणण्यावर ही बंदी असणार आहे.  फूट अँड माऊथ आजार हा प्राण्यांमध्ये होणारा विषाणूजन्य आजार आहे.

August 7, 2024 9:04 AM August 7, 2024 9:04 AM

views 17

युनायटेड किंग्डमच्या दंगलग्रस्त भागात प्रवास न करण्याची भारतीय उच्चायुक्तालयाची सूचना

युनायटेड किंग्डममधल्या गेल्या काही दिवसांतल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर त्या देशात प्रवासाला जाताना सतर्क राहून काळजी घेण्याचा सल्ला लंडनच्या भारतीय उच्चायुक्तालयानं दिला आहे.   भारतीयांनी युकेमध्ये येण्यापूर्वी इथल्या स्थानिक बातम्या आणि स्थानिक सुरक्षा संस्थांनी दिलेल्या सूचना लक्षात घ्याव्यात आणि निदर्शनं सुरू असलेल्या भागात प्रवास टाळावा असं उच्चायुक्तालयानं जारी केलेल्या सूचनेत नमूद केलं आहे. दरम्यान, भारतीयांनी लिबियामध्ये अनावश्यक प्रवास टाळावा अशी सूचना परराष्ट्र व्यवहार मंत्रालया...

August 6, 2024 1:40 PM August 6, 2024 1:40 PM

views 10

बांग्लादेशातल्या परिस्थितीची संयुक्त राष्ट्रांच्या नेतृत्वाखाली चौकशी व्हायला हवी, युनायटेड किंगडमची मागणी

बांग्लादेशमधल्या सध्याच्या परिस्थितीची संयुक्त राष्ट्रांच्या नेतृत्वाखाली चौकशी व्हायला हवी, अशी मागणी युनायटेड किंगडमच्या सरकारनं केली आहे. बांगलादेशाच्या माजी प्रधानमंत्री शेख हसीना यांच्या निवासस्थानामध्ये घुसून काल आंदोलकांनी तोडफोड केली. त्यानंतर शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि लष्करी विमानातून देश सोडला. या पार्श्वभूमीवर बांग्लादेशमध्ये शांतता आणि लोकशाही कायम राहायला हवी, असं युकेचे परराष्ट्र सचिव डेव्हिड लॅमी यांनी काल सांगितलं. बांगलादेशात गेल्या दोन आठवड्यांमध्ये अभूतपूर...