January 23, 2026 7:46 PM

views 24

७४व्या भारत आंतरराष्ट्रीय वस्त्र मेळ्याचं वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांच्या हस्ते उद्घाटन

वस्त्रोद्योगात गेल्या दशकात लक्षणीय प्रगती झाली असून २०१४मध्ये याचं मूल्य ८ लाख ४० हजार कोटी इतकं होतं, ते आता वाढून १६ लाख कोटी रुपयांपर्यंत गेल्याची माहिती वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनी आज दिली. नवी दिल्ली इथं ७४व्या भारत आंतरराष्ट्रीय वस्त्र मेळ्याचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. या क्षेत्रातली स्थानिक बाजारपेठही ६ लाख कोटीवरून १३ लाख कोटीवर गेल्याचं, तसंच कोरोनानंतर देशाच्या निर्यातीतही २५ टक्क्यापेक्षा जास्त वाढ झाल्याचं त्यांनी सांगितलं. डिसेंबर २०२५पर्यंत देशाचा वस्त्रोद्योग २...

September 5, 2024 10:35 AM

views 21

भारत टेक्स पुढील वर्षी 14 ते 17 फेब्रुवारी दरम्यान होणार

जागतिक स्तरावरील वस्त्रोद्योग प्रदर्शन अर्थात भारत टेक्स पुढील वर्षी १४ ते १७ फेब्रुवारीदरम्यान नवी दिल्लीतील भारत मंडपम तसंच नॉइडातील भारत एक्सपो केंद्र आणि मार्ट इथं आयोजित करण्यात येणार आहे. अशी घोषणा केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी काल नवी दिल्ली इथं केली. केंद्र सरकार आणि वस्त्रोद्योगातील विविध कंपन्यांनी हे योजन केलं आहे. ५ हजार उद्योगांचे प्रतिनिधी आणि ६ हजारपेक्षा जास्त विक्रेते या उपक्रमांत सहभागी होणार आहेत. हे प्रदर्शन 5Fअर्थात वस्त्र धाग्यांसाठी शेती, उद्योग, फॅशन, पर...