November 12, 2025 7:41 PM November 12, 2025 7:41 PM
16
भारत आणि मॉरिशसचं मासेमारी, सामुद्रिक तंत्रज्ञान, विक्षारण क्षेत्रात सहकार्य व्हावं-डॉ. जितेंद्र सिंग
मासेमारी ,सामुद्रिक तंत्रज्ञान, विक्षारण यासारख्या क्षेत्रात भारत आणि मॉरिशस या दोन्ही राष्ट्रांत अधिक गहिरं सहकार्य व्हावं असं केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी म्हटलं आहे. जेष्ठ सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आयोजित दुसऱ्या क्षमता वृद्धी कार्यक्रमात मॉरिशसच्या प्रतिनिधींसमोर ते बोलत होते. मॉरिशसच्या विकासविषयक उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी भारताचा समुद्र सरोत व्यवस्थापन क्षेत्रातला प्रदीर्घ अनुभव महत्वाची भूमिका बजावू शकतो असंही प्रतिपादन त्यांनी केलं.