March 15, 2025 9:10 PM March 15, 2025 9:10 PM

views 6

ग्राहकांना हक्कांची जाणीव करुन देण्यासाठी आणि त्यांची दिशाभूल रोखण्यासाठी सरकार कटीबद्ध-प्रल्हाद जोशी

ग्राहकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करुन देण्यासाठी तसंच त्यांची दिशाभूल होऊ नये म्हणून केंद्रसरकार वचनबद्ध असल्याचं ग्राहक व्यवहार मंत्री  प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे, जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त आयोजित एका वेबिनारला ते संबोधित करत होते. ग्राहकांचं केवळ संरक्षणच नव्हे तर ग्राहकांची समृद्धी हे देखील सरकारचं उद्दिष्ट आहे असं ते म्हणाले. प्रदूषण,जैवविविधता आणि हवामानबदलाच्या आव्हानाला समोरं जाण्यासाठी आरोग्यदायी आणि शाश्वत जीवनशैली अंगिकारण्यासाठी सर्वांना पर्याय उपलब्ध करुन देणं आवश्यक असल्...

March 2, 2025 5:21 PM March 2, 2025 5:21 PM

views 7

अन्न सुरक्षा सुनिश्चित करून पुरवठा साखळी वाढवण्यात वखार महामंडळाची महत्त्वाची भूमिका-प्रल्हाद जोशी

देशात पुरवठा साखळी मजबूत करण्यात आणि अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यात केंद्रीय वखार महामंडळ महत्त्वाची भूमिका बजावत आहे, असं केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज, वखार महामंडळाच्या ६९व्या स्थापना दिनानिमित्त दिलेल्या व्हिडिओ संदेशात म्हटलं आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात वखार महामंडळानं आपली साठवण क्षमता २१ लाख चौरस फूटाहून अधिक वाढवली असल्याचं त्यांनी सांगितलं. 

January 6, 2025 8:51 PM January 6, 2025 8:51 PM

views 3

चांदीसाठी हॉलमार्किंग बंधनकारक करण्याचा विचार करण्याची सूचना – प्रल्हाद जोशी

ग्राहकांच्या मागणीनंतर चांदी आणि चांदीच्या वस्तूंसाठी हॉलमार्किंग बंधनकारक करण्याचा विचार करण्याची सूचना ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी भारतीय मानक ब्युरोला केली आहे. नवी दिल्लीत भारतीय मानक ब्युरोच्या ७८ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.   भारतीय मानक ब्युरोनं त्याच्या स्थापनेपासून विविध क्षेत्रांमध्ये मानके तयार करणं, त्याची अंमलबजावणी करणं आणि प्रोत्साहन देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असल्याचंही ते म्हणाले. गुणवत्ता नियंत्रण आदेश क्यूसीओ केवळ ग्राहक...

January 5, 2025 9:24 AM January 5, 2025 9:24 AM

views 2

मध्यप्रदेश : केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केली ओंकारेश्वर तरंगत्या सौर प्रकल्पाची पाहणी

देशात सौर ऊर्जा निर्मिती क्षेत्रात ९० गिगावॅट क्षमता असून त्याला चालना देण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील, असं मत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी व्यक्त केलं. त्यांनी काल मध्यप्रदेशमधल्या खंडवा जिल्ह्यातील ओंकारेश्वर तरंगत्या सौर प्रकल्पाची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. ओंकारेश्वर तरंगता सौर प्रकल्प हा मध्य प्रदेशातील पहिला आणि देशातील सर्वात मोठ्या तरंगत्या सौर प्रकल्पांपैकी एक अनोखा प्रकल्प असून त्याची देशातल्या अन्य ठिकाणीही पुनरावृत्ती होऊ शकते, असं सांगत २०३० पर्यंत ५०० ग...