October 16, 2024 3:38 PM

views 11

‘भारत’ खेळणी निर्यात करणारा देश बनल्याचं मंत्री पियूष गोयल यांचं प्रतिपादन

खेळणी तयार करण्यासाठी सर्व प्रकारचे घटक उपलब्ध करून देणारी परिसंस्था भारताने तयार केली असून भारत हा आता खेळणी निर्यात करणारा देश बनल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी सांगितलं. नवी दिल्ली इथं पहिल्या इंडियन फाऊंडेशन क्वालिटी मॅनेजमेंट परिषदेच्या समारोपाच्या कार्यक्रमात ‘विकसित भारत २०४७ साठी राष्ट्रीय गुणवत्ता चळवळीचं शासन’ या विषयावर गोयल बोलत होते. देशात एक मजबूत गुणवत्तापूर्ण परिसंस्था तयार करण्यासाठी सरकार झिरो डिफेक्ट, झिरो इफेक्ट या सूत्रानुसार काम करत आहे, असं गोयल ...

September 20, 2024 1:57 PM

views 16

केंद्रीय मंत्री पियुष गोयल २ दिवसांच्या लाओस दौऱ्यावर

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल २१ व्या आसियान - भारत अर्थ मंत्र्यांची बैठक आणि १२व्या पूर्व आशिया शिखर परिषदेच्या अर्थमंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी २ दिवसांच्या लाओस दौऱ्यावर जाणार आहेत. वाणिज्यमंत्री या दौऱ्यात,या  बैठकांशिवाय भागीदार देशांच्या समकक्ष मंत्र्यांबरोबर अनेक द्विपक्षीय बैठका घेणार आहेत. तसंच, ते लाओस, कोरिया, मलेशिया, स्विझर्लंड आणि म्यान्मार या देशांच्या मंत्र्यांची भेट घेणार आहेत. गोयल आसियानचे महासचिव तसंच आशिया प्रशांत क्षेत्रातली प्रमुख संशोधन संस्था ‘ए...